MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल

MNS : नुकतीच एका मनसैनिकाची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना परभणीतील आहे. परभणी शहरात एका मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

सचिन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते परभणी येथील मनसेचे शहर प्रमुख होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे परभणी शहरात शोककळा पसरली आहे.

किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, किरकोळ वाद की, मोठा वाद? याबाबत पोलिस तपास घेत आहेत. तसेच सचिन पाटील यांच्या मित्रानेच ही हत्या केली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ही घटना कळताच सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनपर्यंत याप्रकरणी कोणालाच ताब्यात घेण्यात आले नाही. पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे सचिन पाटील यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला जाणार आहे

पोलिसांकडून सचिन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोन कॉल रेकॉर्ड्स तपासून पाहण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
“मी मुर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, मी पिएचडी होल्डर आहे, आणि…,” हाफकिन प्रकरणावरून तानाजी सावंत संतापले