पुणे(Pune) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टेलरिंग दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने कामावरून काढल्याच्या रागातून दुकानाच्या मालकीण असणाऱ्या महिलेला पेटवून दिले आहे. या घटनेमध्ये आरोपी व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला आहे. पुणे शहरातील वडगाव शेरीमध्ये ही घटना घडली आहे.(The mistress was burned alive by the anger of being fired)
या घटनेत दोघांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद नाथसागर हा व्यक्ती एका टेलरिंग दुकानात काम करत होता. बाला नोया जोनिंग यांच्या मालकीचं ते टेलरिंग दुकान आहे. काही दिवसांपूर्वी बाला नोया जोनिंग यांनी मिलिंद नाथसागरला कामावरून काढलं होतं. त्यानंतर मिलिंद नाथसागर खूप संतापला होता.
सोमवारी रात्री मिलिंदने बाला नोया जोनिंग यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि त्यांना पेटवून दिलं. या आगीमध्ये मिलिंद देखील जखमी झाला होता. यानंतर दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. पण मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद नाथसागर याचे मूळ गाव परभणी आहे. गेल्या आठ वर्षांपासून मिलिंद या महिलेच्या टेलरिंग दुकानात काम करत होता. पण काही दिवसांपूर्वी या महिलेने मिलिंदला कामावरून काढले होते. त्यातून मिलिंदने त्या महिलेवर हल्ला केला, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील संगमनेरमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. जुन्या वादातून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवण्यात आले होते. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. संगमनेर मधील अकोले नाका परिसरात एक महिला रस्त्यावरून घरी जात होती. त्यावेळी काही जणांनी त्या महिलेवर हल्ला केला.
त्या महिलेच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतण्यात आली. त्यानंतर महिलेला पेटवून देण्यात आलं. या घटनेत महिलेची मान आणि हात भाजला गेला होता. त्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून १३ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
प्रसिद्ध अभिनेत्रीची आई गंभीर आजारी, ICU मध्ये उपचार सुरू; अभिनेत्रीने चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
मुंबई पोलीस आयुक्त शिवसेनेत जाणार? राऊंतांनी लिस्टच काढली अन् भाजपचे दात घशात घातले
‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने सख्ख्या भावासोबत केला होता रोमान्स, उडाली होती खळबळ