लग्नासाठी अल्पवयीन मुलीनं काढला घरातून पळ, मुलाचा पगार ऐकताच म्हणाली मी नाही राहणार

मुंबई। सध्या ऑनलाईन प्रेमप्रकरणं वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. एखादी मुलगी किंवा मुलगा एकमेकांना न ओळखता, न बघता ऑनलाईनद्वारे मैत्री करतात. मात्र कधीकधी ही मैत्री प्रेमाच्या रूपात बदलते. आतापर्यंत आपण अनेक घटना अशाही पाहिल्या आहेत, ज्यात अनेकांना ऑनलाईन मैत्री करणं महागात पडले आहे.

अशीच एक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून दोन अल्पवयीन मुलगा-मुलगीचं हे प्रेम प्रकरण चांगलंच पुढं पोहोचलं. त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. 16 वर्षीय संबंधित मुलगी लग्न करायचं म्हणून आपल्या घरातून मुलाकडे पळून आली. दोघांनी मग भेट झाल्यावर लग्न कसे करायचे आणि पुढील गोष्टी कशा जमवायच्या याबाबत चर्चा सुरू केली. त्यावेळी मुलीला मुलाचा पगार ऐकून धक्का बसला. व मुलीने लग्नास नकार दिला.

यामध्ये मुलगी आग्रा येथील असून मुलगा धौलपूरचा रहिवासी आहे. यांचं फेसबुकद्वारे प्रेम जुळलं होत. त्यानंतर मुलगी लग्न करण्यासाठी आग्र्याहून राजस्थानमधील धौलपूरला ती घरातून लग्न करण्यासाठी पळून आली.

मात्र मुलाला केवळ 1400 रुपये पगार असल्याचे समजल्याने तिनं थेट लग्न करू शकत नसल्याचं सांगितलं. ते रेल्वे स्थानकावर सर्व बातचीत करत होते. त्यानंतर हे दोघे रेल्वे स्थानकावर अल्पवयीन संशयास्पद स्थितीमध्ये दिसून येत होते. त्यामुळे बाल सुधार समितीने बालकल्याण समितीचे सदस्य गिरीश गुजर आणि बृजेश मुकरिया यांच्यासमोर नेले.

त्यावेळी मुलीने घडलेली संपूर्ण माहिती देत, तिला लग्न करायचे नसल्याचे सांगितले. पगार कमी असला तरी घरची परिस्थिती चांगली आहे, असे सांगून मुलगा तिला घरी जाण्याचा आग्रह करत होता. पण ती तयार झाली नाही. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्यांना पोलिसांनी धौलपूरला बोलावून घेतलं. व सध्या तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या
शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला चोपणारा शिवसैनिक कोण माहितीये का? जाणून घ्या..
भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू, निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा
‘लगान’ चित्रपटातील गोरी मॅम आज दिसते ‘अशी’; पहा फोटो
कॅन्सर पिडीत व्यक्तीने भावूक होत धरले थेट सोनू सुदचे पाय, मग सोनूने काय केले पहाच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.