‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ जवळपास १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. एकामागून एक सर्व कलाकार या शोसोबतचे नाते तोडत आहेत. त्यात सतत हा शो वादात सापडलेला आहे. या शोशी संबंधित धक्कादायक बातम्या दररोज समोर येत आहेत.
या शोच्या निर्मात्यावर कलाकारांचा रोष आहे. आता जुन्या अंजली वहिनीने निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. तारक मेहताच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री नेहा मेहता हिने साकारल्याचे तुम्हाला आठवत असेल. १२ वर्षे जोडलेली अभिनेत्री नेहा मेहता हिने नंतर शोचा निरोप घेतला. तिच्या जागी सुनैना फौजदार आता अंजलीच्या भूमिकेत आहे.
पण आता नेहा मेहताने एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने शो सोडला पण २ वर्षांनंतरही तिला तिचे पैसे मिळालेले नाहीत. २ वर्षांनंतर आता अभिनेत्री नेहा मेहताने सांगितले आहे की, शोच्या निर्मात्यानी अद्याप तिचे जुने बिल क्लिअर केलेले नाही. होय, अभिनेत्रीचे म्हणणे आहे की तिची सहा महिन्यांची फी अद्याप बाकी आहे आणि ती कधी मिळेल याची कल्पना नाही.
मीडियाशी बोलताना नेहा मेहता म्हणाली, ‘मी सुमारे १२ वर्षे तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम केले आणि त्यानंतर २०२० मध्ये शो सोडला. मात्र गेल्या सहा महिन्यांची माझी फी अद्याप मिळालेली नाही. शो सोडल्यानंतर मी निर्मात्यांना अनेकदा फोन करून त्याबद्दल बोललो. मी तक्रार करत नाही पण मला आशा आहे की ते लवकरच माझी फी क्लियर होईल, आणि मला माझ्या मेहनतीचे नक्कीच फळ मिळेल.
तुम्हाला सांगतो, शोमधील अंजली आणि तारकची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली होती. त्याचवेळी, आतापर्यंत अभिनेत्रीला तिच्या मेहनतीचे पैसे दिले गेले नाहीत, ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे. आशा आहे की तारक मेहताचे निर्माते नेहाची फी लवकरात लवकर देतील.
महत्वाच्या बातम्या
सलमानच्या विरोधात बोलल्यानंतर ‘या’ गायिकेला आल्या होत्या बलात्काराच्या धमक्या, वाचून धक्का बसेल
“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”, बंडखोर शिवसेना आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल
बंडखोर आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरे सरकारवर भडकले; म्हणाले…