पठ्ठाचं नशीब फळफळलं! १०वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहचला थेट स्वित्झर्लंडला

आतापर्यंत आपण अनेकांच्या खऱ्या आयुष्याबद्दल अनेक आगळ्यावेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. कोणी गरिबीतून वर येण्यासाठी काबाड कष्ट करतो, तर कोणी आपल्या शिक्षणासाठी मेहनत घेत असतो.  जगात अशी अनेक लोक आहेत,ज्यांचं शिक्षण फार कमी झाले आहे.

मात्र तरीही ते त्यांच्या पायावर खंबीर उभे आहेत. गाडी, बंगले, स्वतःचा व्यवसाय आहे. खरतर गरिबीतून जेव्हा एखादा माणूस वर येतो तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी त्याच्या पाठीशी खंबीर उभं असत. कोणाचे आईवडील मुलाची साथ देत असतात, कुणाची बायको कायम सोबत असते,तर कुणाचे मित्र त्याच्या पाठीशी कायम असता.

अशीच एक १०वी नापास रिक्षावाल्याची कहाणी आहे. आज तो रिक्षावाला स्वित्झर्लंडमध्ये राहतो. मात्र, इथवर पोहोचण्यामागे त्यांच्या प्रेमाचा मोठा हात आहे. या तर पाहुयात रिक्षावाल्याची प्रेमकहाणी.

ही कहाणी आहे राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज यांची. रंजीत यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ते सांगतात, ‘मी १०वीच्या वर्गात नापास झालो होतो. अभ्यासातही कच्चाच होतो. माझ्या पालकांनी मला काही तरी बनण्यासाठी शाळेत पाठवले होते. कुणालाही माझ्या क्रिएटिव्हिटी आणि कल्पनांशी काही एक देणे-घेणे नव्हते.’

त्यांनी १६ व्या वर्षी शिक्षण सोडले व ऑटोरिक्शा चालवायला लागले. बरेच वर्ष त्यांनी जयपूरमध्ये ऑटोरिक्शा चालवली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, टुरिस्टला इंप्रेस करण्यासाठी ऑटो ड्रायव्हर्स इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात. यानंतर त्यांनीही इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली.

राज सांगतात, २००८ मध्ये जग आयटी क्षेत्राकडे धावत असताना, माझी इंग्रजी शिकण्याची इच्छा होती. यानंतर त्यांनी टुरिझमचा उद्योग सुरू केला. ते परदेशातील लोकांना राजस्थान फिरवत होते. त्याचवेळी त्यांची एका परदेशी मुलीशी भेट झाली. ही मुलगी त्यांची क्लायंट होती. ती तीच्या एका मैत्रिणीसोबत आली होती.

काही वेळानंतर आम्ही दोघे एक-मेकांना आवडू लागलो आणि आमचे बोलणे सुरू झाले. आम्ही पहिल्यांदा सीटी पॅलेसमध्ये भेटलो असे राज म्हणतात. त्यानंतर त्यांच्यात बोलणे वाढले व त्यांना प्रेमाची जाणीव झाली. ती फ्रान्सला निघून गेली तरीही त्यांचे बोलणे सुरूच होते.

राज यांनी अनेक वेळा तिला भेटण्यासाठी फ्रान्सला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी त्याचा व्हिसा रिडेक्ट होत होता. एवढ्या वेळा व्हिसा रिजेक्ट होऊनही आमचे नाते कायम होते. मग आम्ही दोघे फ्रान्स दुतावासासमोर उपोषणाला बसलो. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना तीन महिन्यांचा व्हिसा देण्यात आला.’

त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केले व एका वर्षानंतर गोड मुलाला जन्म दिला. यानंतर राजने लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज केला. त्यांना फेन्च भाषा शिकावी लागली. व आता राज आपली पत्नी आणि मुलासह जेनेव्हा येथे राहतात. व रेस्टोरन्टमध्ये काम करता. राज यांनी लवकरच स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
दुर्दैवी! बहिणीने भावासाठी केलं होत यकृत दान, शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू
सर्वांना खळखळून हसवणाऱ्या भुवन बामवर कोसळला दु:खाचा डोंगर; कोरोनामुळे गमावले आई-वडिल
नागिणीने घेतला नागाच्या हत्येचा बदला,नागाची हत्या करणाऱ्याला तिने शोधलं आणि..
मोठा खुलासा! खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्नापूर्वी होते ‘या’ आरोपीसोबत प्रेमसंबंध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.