wedding ceremony : वधूच्या संमतीशिवाय कोणतेही लग्न झाले की त्यात काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नेहमीच असते. अनेक वेळा वधूने लग्नातून पळून जाऊ नये अशी शंकाही घरच्यांना असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रियकर स्टेजवर येतो, वधूच्या भांगेत सिंदूर भरतो आणि नंतर तिच्यासोबत पळून जातो.
या घटनेचे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता जाणून घेऊया. हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे ज्यात एक माणूस, वृद्ध वराला दुसऱ्याशी बोलण्यात गुंतलेला पाहून स्टेजवर पोहोचतो आणि वधूच्या भांगेत सिंदूर भरतो आणि नंतर वधूसोबत पळून जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाचा सोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
स्टेजवर वधू-वर बसले आहेत. वराचे वय खूप जास्त आहे, तर वधूचे वय कमी आहे. वधू खुर्चीला डोक लावून शांत बसली आहे. त्याच वेळी, वर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अनेक महिलांशी बोलण्यात व्यस्त आहे. यादरम्यान अशी काही घटना घडते जे पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
खरं तर, जेव्हा वर दुसऱ्या महिलांशी बोलण्यात व्यस्त असतो, तेव्हा स्टेजच्या मागून एक पुरुष वधूच्या दिशेने चालत येतो, जो वधूचा प्रियकर असल्याचे दिसते. त्या व्यक्तीने हातात सिंदूर घेतलेला आहे. तो वधूच्या खुर्चीच्या मागे उभा राहतो आणि मागून तिला सिंदूर लावू लागतो. पुरुष वधूच्या भांगेत 5 वेळा सिंदूर भरतो.
धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान वराला हे सर्व घडताना दिसत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की वधूला सिंदूर लावल्यानंतर तो पुरुष तिचा हात धरून तिला चालण्याचा इशारा करतो. नववधूनेही त्या व्यक्तीला ओळखले आहे असे दिसते, तीही उठते आणि दोघेही स्टेजच्या मागून शांतपणे फरार होतात.
हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे. हे पाहिल्यानंतर यूजर्स वेडे होत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर shitty.humours नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. यावर कॅप्शन लिहिले आहे – ”मौके पर चौका’.
महत्वाच्या बातम्या
World Cup: वर्ल्डकपआधी भारतीय संघाचा मोठा निर्णय; रोहित शर्मा ऐवजी केएल राहुलला केले कर्णधार
Silver rain : घराची भिंत पाडताच पडला चांदीच्या नाण्यांचा पाऊस, खजिना लुटण्यासाठी गावकऱ्यांची तुफान गर्दी
Eknath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; कोट्यवधींची कामं केली रद्द, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण






