टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे गमवावा लागला जीव; चार कोटींच्या स्कॉलरशिपच्या जोरावर गाठली होती अमेरिका

बुलंदशहर | अभ्यासात अत्यंत हुशार अशी सुदीक्षा भाटी हिने २ वर्षांपूर्वी इंटरमिडीएट परीक्षेत बुलंदशहर जनपद येथे टॉप केले होते. स्कॉलरशिप भेटल्यानंतर ती अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेली होती.

तिला खूप पुढे जायचे होते पण काही महाभागांनी तिच्याबरोबर केलेल्या छेडछाडीमुळे तिचा मृत्यू झाला. कोरोना काळात आपल्या घरी परतलेली समीक्षा आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होती. ती तिच्या काकांबरोबर गाडीवर मागे बसली होती.

रस्त्यामध्ये बुलेटवर काही टवाळखोरांनी तिच्यासोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. छेडछाड करताना ती टवाळखोर मुले वारंवार ओव्हरटेक करत होते. त्याच वेळेस त्यांच्यापासून वाचताना तिच्या काकांची गाडी घसरली आणि सुदीक्षा आणि तिचे काका रस्त्यावर आदळले.

त्यानंतर सदीक्षाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सदीक्षाने २०१८ मध्ये इंटरमिडीएट परीक्षेत टॉप केले होते. त्यानंतर तिला HCL कडून ३ करोड ८० लाखांची स्कॉलरशिप मिळाली होती. नंतर ती अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेली होती.

सुदीक्षा अमेरीकेतल्या बॉब्सन कॉलेजमध्ये शिकत होती. तिचा सगळा खर्च भारत सरकारने उचलला होता. सुदीक्षाचा परिवार गौतमबुद्धनगरच्या दादरी भागात राहतात. तिच्या घरच्यांनी सांगितले की, कोरोनामुळे सुदीक्षा अमेरिकेतुन परत घरी आली होती. ती आपल्या मामाला भेटायला चालली होती.

काही दिवसांनंतर ती पुन्हा अमेरिकेला जाणार होती. पण कोणाला माहिती होते की, काही टवाळखोरांच्या चुकीमुळे तिच्यासोबत असे होईल आणि ती पुन्हा अमेरिकेत जाऊ शकणार नाही.

पोलिसांनी तिच्या डेडबॉडीला पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. अज्ञात बाईकर्सचा पोलीस तपास करत आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.