पतीच पत्नीला दीर आणि सासऱ्यांसोबत संबंध ठेवायला भाग पाडत होता; म्हणाला द्रोपदी बनून राहावं लागेल

अहमदाबाद | महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. छळ करणे, लैंगिक शोषण करणे, बलात्कार, मारहाण यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुजरातमध्ये अशीच एक माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील चांदखेडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहितेला तिच्या पतीने दिराशी आणि सासऱ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, या तरूणीचे अवघ्या एक महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. तरूणी चांगला मुलगा भेटल्याने खुश होती. लग्नानंतर तिने नवऱ्यासोबत मोठी स्वप्न रंगवली होती. मात्र तिच्या सासरच्यांच्या मनात काहीतरी वेगळचं शिजत होतं. तरूणीच्या सासरच्यांनी या तरूणीसोबत संताप येणार कृत्य केलं आहे.

लग्नाला दोन दिवसचं उलटले होते. विवाहीतेच्या पतीने तिचा छळ करण्यास सूरूवात केली. तिच्याशी बारीक बारीक गोष्टीवरून भांडणे काढून जबर मारहाण करत असे. या सर्व त्रासामुळे विवाहिता खचून गेली होती.

नवऱ्याने पत्नीला सासऱ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास सांगितलं. हे ऐकताच पत्नीच्या पायाखालाची जमीनचं सरकली. तिने यासाठी नकार दिला असता पतीने धमकी दिली इथं राहायचं असेल तर द्रोपदी बनून राहावं लागेल.

विवाहिता या प्रकारानंतर घाबरून गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या दिरानेही  खोलीत घुसून जबरदस्ती केली आणि मारहाण केली. यानंतर विवाहितेने सासरच्यां विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करत आहेत. याला आळा बसण्यासाठी अत्याचार पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे, असं नेहमी सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”
“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली
“…तर त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.