बायको म्हणायची आई वडीलांपासून वेगळे रहा; नवऱ्याने तिला कायमचे संपवले व स्वत:ही केली आत्महत्या

मुंबई | मुंबईतील ठाण्यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने मारहाण करून तिची हत्या केली आहे. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय सांगता! तरुणीने मोडला कोरोनाचा नियम पण पोलिसाने तिला फक्त किस करून सोडले, पहा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बालाजी समुखराव (वय 29)  आणि आश्विनी आकाश समुखराव (वय 19) अशी पती पत्नीची नावे आहेत. आकाश आणि आश्विनी दोघे आकाशच्या आईवडिलांसोबत रणजित शिरसाठ यांच्या शिवमहिमा चाळीतील खोलीत भाड्याने राहत होते. आकाशची पत्नी आणि आई यांच्यात वेगळे राहण्यावरून सतत भांडणं होत होती.

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच बांधली लगीनगाठ, पाच दिवसांनी पुन्हा जावं लागणार तुरूंगात

घटनेच्या दिवशी पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. आणि वाद विकोपाला जावून रागाच्या भरात आकाशने हातोड्याने आश्विनीला मारहाण केली. डोक्यात हातोड्याचा मार बसून आश्विनी जागीच ठार झाली. याप्रकरणी आकाशच्या वडिलांनी श्रीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीला न सांगता माहेरी जावून राहणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दिला दणका, दिला मोठा निर्णय

वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्ही.एन. शिंदे, सहाय्यक पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. घरगूती वादातून घटना घडली का? का यामागे दुसरं काही कारण आहे. याचा तपास पोलिस करत आहेत.

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.