लातूरमधील धक्कादायक घटना! वांग्याची भाजी न दिल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला रॉकेलने जाळलं

लातूर। आपण आतापर्यंत अनेक नवरा बायकोच्या भांडणाच्या घटना ऐकल्या आहेत. अनेक वाद गंभीर असल्यास हे पोलीस स्टेशनपर्यंत पोहचतात. जर घरगुती साधे वाद असतील तर ते थोड्या कालावधीनंतर मिटतात. मात्र लातूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चक्क नवऱ्याने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून बायकोला जाळले आहे. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना उदगीर तालुक्यातील मौजे हेर येथे घडली. वांग्याची भाजी संपल्याचे बायकोने सांगितल्याने बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळलं आहे. नक्की प्रकरण काय पाहुयात.

फरजाना शादूल शेख असं या पीडित महिलेचे नाव असून मौजे हेर येथे राहतात. 8 जून रोजी तिने सकाळी 8 वाजता स्वयंपाक केला.मात्र, तिचा नवरा म्हणजेच शादूल शेख न जेवता घरातून बाहेर गेला आणि रात्री 9.30 वाजता दारु पिऊन घरी आला.

सकाळी केलेली वांग्याची भाजीच जेवायला दे असे त्याने सांगितले. सकाळी केलेली भाजी संपलेली असं बायकोने त्याला सांगितल्यावर मला तीच भाजी हवी म्हणून त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर चुलीजवळ ठेवलेल्या रॉकेलच्या बाटलीमधील रॉकेल महिलेच्या अंगावर टाकून काडी पेटवून अंगावर टाकली.

शेजारी राहणाऱ्यांनी आग विझवून पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर या पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली व पोलिसांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी शादूल नजीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शादूल शेख याचे इतर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच तो सतत दारु पित असतो. लग्न झाल्यापासून तो बायकोला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.