पती आणि त्याच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय जर पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली, तर तो गुन्हा ठरू शकत नाही किंवा ती क्रूरता ठरू शकत नाही. एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. या याचिकेत कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.(Wife, Husband, Allahabad High Court, Mohit Preet Kapoor, Sumit Kapoor, Divorce, Maher)
ज्यात पती आणि सासरच्या लोकांच्या परवानगीशिवाय महिला तिच्या माहेरच्या घरी गेल्याच्या कारणावरुन पतीच्या बाजूने घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला होता. खरं तर, अपीलकर्ता, मोहित प्रीत कपूर आणि प्रतिवादी सुमित कपूर यांनी २०१३ साली लग्न केले होते. २०१७ मध्ये, पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती कारण अपीलकर्ता म्हणजेच पत्नीने कोणतेही कारण नसताना त्याच्या अनुपस्थितीत सासरचे घर सोडले होते.
एवढेच नाही तर महिलेने पतीच्या घरी परत येण्यासही नकार दिला होता. आपल्या याचिकेत पतीने असेही म्हटले होते की महिलेने घरातील कामे करण्यास नकार दिला होता आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांशी गैरवर्तन केले होते. दरम्यान, पत्नीनेही हिंदू विवाह कायद्याच्या कलम २४ अंतर्गत अर्ज दाखल करून पतीकडे पोडगीची मागणी केली होती.
न्यायालयाने पत्नीचा अर्ज मान्य करत पतीला महिलेला ५ हजार रुपये आणि मुलीला २ हजार रुपये मासिक पोडगी देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, दोन्ही पक्षांच्या वागणुकीवरून असे म्हणता येणार नाही की, महिलेने पतीच्या गैरहजेरीत सासरचे घर कायमचे सोडून देऊन हा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाने सांगितले की, ती महिला गरोदर होती आणि ती काही दिवसांसाठी ४०० मीटर अंतरावर असलेल्या तिच्या माहेरच्या घरी गेली असावी. अशाप्रकारे, अपीलकर्त्याने परवानगीशिवाय आपल्या मातृगृहात जाणे हे पतीने सोडल्याचा गुन्हा मानता येणार नाही. शिवाय, तो क्रूरतेचा गुन्हा देखील नाही.
एवढेच नाही तर न्यायालयाने प्रतिवादी पतीला फटकारले की, तो आणि त्याचे वकील या प्रक्रियेत कधीही सहभागी झाले नाहीत, यावरून तो आपल्या अल्पवयीन मुलाच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढू इच्छितो, असे दिसून येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला, ज्यामध्ये पतीच्या बाजूने घटस्फोटाचा आदेश देण्यात आला होता. यासोबतच मुलीच्या पालनपोषणासाठी पतीला दरमहा 30 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
रियाच्या ‘या’ ५ विधानांमुळे गेली सुशांत सिंग राजपूतची इज्जत, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ
सुशांत काल माझ्या स्वप्नात आला, त्याने मला सांगितले की…; पहा काय म्हणाली होती म्हणतेय रिया
“जुमला नाही तर महाजुमला मोदी सरकार! आधी म्हणाले २ कोटी आता म्हणतात २ लाख नोकऱ्या देणार”
पंतप्रधान मोदींनी देहूत सावरकरांबद्दल थाप मारली; सावकरांच्या लिखाणानेच केली पोलखोल