ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…

उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागातील शहर प्रयागराज ज्याचे आधीचे नाव अलाहाबाद असे होते. या शहरात संगमाजवळ हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमाची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. असे मानले जाते की जेव्हा लोक कुंभात आंघोळ करण्यासाठी येतात, तेव्हा झोपलेल्या हनुमान मूर्तीच दर्शन घेतल्याशिवाय अंघोळ पूर्ण होत नाही.

कुंभाचे दिवस वगळता या मंदिरात मंगळवार आणि शनिवारी प्रचंड नैवेद्य असतात. हे शहर आणि हे मंदिर पुन्हा चर्चेत आहे. कारण असे आहे की, हनुमान मंदिराचे महंत नरेंद्र गिरी यांचे आकस्मित निधन. नरेंद्र गिरी हे पंचायती आखाडा श्री निरंजनी आणि हनुमान मंदिराचे महंत होते. तसेच ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षही होते.

Yogi With Anand Giri

 

नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजच्या अल्लापूर येथील बाघंब्री मठात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. या मृत्यूबरोबरच आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे आनंद गिरी. आनंद गिरी हे महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे कारण नरेंद्र गिरी यांच्या कथित सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

महंत नरेंद्र गिरी यांचे सोमवारी २० सप्टेंबर रोजी संशयास्पद परिस्थितीत निधन झाले. त्यांनी आपले शिष्य आनंद गिरी यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावरून आनंद गिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आनंद गिरी हा एकेकाळी नरेंद्र गिरीचा उत्तराधिकारी होता. त्यांचे एकमेकांसोबत वाद झाले होते.

या वर्षी जून महिन्यात दी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आनंद गिरी यांनी सांगितले होते की ते लहानपणापासून साधू आहेत. त्यांचा जन्म १९८० मध्ये झाला. किशोरवयीन अवस्थेत पोहोचताच त्यांनी १९९३ च्या आसपास त्यांनी संन्यास घेतला. ब्रह्मचारी झाल्यानंतर त्यांना संन्यासाची दीक्षा मिळाली.

या कथेसाठी संशोधन करत असताना, “आनंद गिरी योग” नावाची वेबसाइट सापडली.  त्यात दिलेल्या माहितीनुसार आनंद गिरी म्हणजे आशीर्वादांचा पुनर्जन्म. वेबसाईट नुसार आनंद गिरी यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले.

त्यांनी आपले सुरुवातीचे आयुष्य केदार, हिमालयातील तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर, मदमहेश्वर, त्रयोगी नारायण आणि वासुकिताल येथे घालवले, जिथे त्यांनी गिरीजानंद सरस्वती महाराजांखाली वेद आणि आयुर्वेद शिकले. महामंडलेश्वर विश्वगुरु महाराजांच्या आश्रयाखाली त्यांनी योग ऋषिकेश येथे योग शिक्षण घेतले. आनंद गिरी यांनी संस्कृत व्याकरण, आयुर्वेद आणि वैदिक तत्त्वज्ञानात पारंगत असल्याचा दावाही केला जातो. आनंद गिरी हे बनारस हिंदू विद्यापीठातून पदवीधर आहेत असे या साईटमध्ये म्हटले आहे. त्यांनी योग तंत्रात P.hd करत असल्याचेही म्हटले आहे.

आनंद गिरीच्या शब्दात सांगायचे झाले तर नरेंद्र गिरी जेव्हा महंत नव्हते तेव्हा ते त्यांचे शिष्य झाले आहे. नरेंद्र गिरी यांना २००४ मध्ये महंत करण्यात आले. यानंतर त्यांना हरिद्वारहून प्रयागराजला आणण्यात आले. आनंद म्हणतात की गुरुजींनी आपल्या विश्वासू लोकांना आपल्यासोबत ठेवण्यास सुरुवात केली. आनंद त्यावेळी गुजरातमध्ये होते, पण गुरुजींच्या सांगण्यावरून ते २००५ मध्ये प्रयागराजला आले.

Anand Giri And Narendra Giri

आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांची भेट सुमारे १८ वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून आनंद गिरी हे नरेंद्र गिरी यांच्यासोबत होते. अनेकांच्या म्हण्यानुसार एकेकाळी असे होते की नरेंद्र गिरी यांचे सर्व काम आनंद गिरी पाहत होते. एका आठवड्यात फक्त नरेंद्र गिरी हनुमान मंदिराच्या सिंहासनावर बसायचे आणि उरलेले 6 दिवस सिंहासन सांभाळण्याची जबाबदारी आनंद गिरी यांच्यावर होती. ते छोटे महाराज म्हणून अलाहाबादमध्ये प्रसिद्ध होते. असे म्हटले जाते की नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांनी २०१९ मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या अर्धकुंभमध्ये एकत्र पूर्ण तयारी केली होती. पण संपूर्ण गोष्ट सिंहासन आणि उत्तराधिकारावर अवलंबून नसते.

आनंद गिरी यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या प्रतिमेवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, आनंद गिरी यांनी अर्धकुंभमधील तंबू कामगाराचे सर्व सामान जप्त केले होते. तंबूवाल्याला पोलिसांच्या फेऱ्या माराव्या लागल्या. परंतु दी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आनंद गिरी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

आनंद गिरी यांच्यानुसार माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जगाच्या कोणत्याही भागात अपराधाचा घडला नाही. ते ब्राह्मण कुळातील व्यक्ती होते. संत झाले आणि हिमालयात प्रवास केला. संतांचा सहवास घेतला. माझे जीवन एक खुले पुस्तक आहे. मी काहीही लपलेले नाही.

तंबूचा माल जप्त करण्याच्या प्रकरणावर, आनंद गिरी म्हणाले होते की, जेव्हा आम्ही कॅम्प लावतो, तेव्हा आमची यंत्रणा अनेक लोकांसोबत चालते. लोक काम करतात, हिशोब देतात आणि पैसे घेतात. मी कोणाचे सामान का जप्त करू? मला ते घरी घेवून जायचे नाही.

आनंद गिरीवर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला आहे. आनंद गिरीवर २०१६ मध्ये सिडनीच्या रूथी हिल परिसरात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याच्यावर दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. वर्ष २०१९ मध्ये, जेव्हा आनंद गिरी दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला गेले, तेव्हा त्यांना अटक करण्यात आले आणि प्रकरण पुढे गेले. चार महिन्यांनंतर न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता केली.

हे ही वाचा-

बिग ब्रेकींग! आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले

७२ तासात माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार; अनिल परबांकडून सोमय्यांना अल्टिमेटम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.