राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच घराच्या दिशेने चपलांचे जोडे देखील फेकले आहेत.(The Home Minister gave strict orders about st workers attack on sharad pawar)
या सर्व घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेच्या अनुषंगाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लिहिले आहे की, “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागलं ते अयोग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेरील निदर्शने अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारा कोण हे सर्वश्रुत आहे. ता घटनेचा तपास केला जाईल”
या पोस्टमध्ये पुढे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लिहिले आहे की, “महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी चर्चेचा मार्ग नेहमीच खुला ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी संवैधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडले पाहिजेत.कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला वाईट वळण देऊन कायदा हातात घेऊ नये”, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/Dwalsepatil/posts/5243890255632021
या हल्ल्याबाबत माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले की, “न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं आहे आणि आज अचानक हल्ला केला आहे. हे मला वाटतं ठरवून केलेलं आहे. यामागे कुठलीतरी अज्ञात शक्ती आहे. या शक्तीच्या पाठिंब्याशिवाय अशी घटना घडणार नाही”, असे गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले की, “न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांनी कामावर हजर राहावं. कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करणार नाही, असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. जर काही प्रश्न असतील तर त्यासंबंधित मंत्री चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील”, असे गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या हल्ल्यावर मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कुठे दिसतंय हल्ला केल्याचं? चपला सुटल्या असतील; पवारांवरील हल्ल्यानंतर सदावर्तेंची प्रतिक्रीया
घरावर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे पण…’
आसाराम बापूंच्या आश्रमात आढळला तरुणीचा मृतदेह; चार दिवसांपासून होती गायब