भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी स्वतःवर कोरोना लसीची चाचणी करून घेतल्याचा ‘तो’ फोटो खोटा

 

नवी दिल्ली। भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात भारत बायोटेकने कोरोनावरील लस तयार केली असून याची क्लिनिकल ट्रायल होणार असल्याची चर्चा आहे.

याच्या मानवी चाचणीसाठीही परवानगी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चेदरम्यान सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोमधून, मानवी चाचणी केल्याचा, लसीचा पहिला डोस बीबीआयएलचे उपाध्यक्ष व्ही.के. श्रीनिवास यांना दिल्याचा दावा केला जात आहे. भारत बायोटेकच्या नावाने सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.

मात्र आता त्याबाबतची एक माहिती समोर आली आहे.  भारत बायोटेकचा फोटोमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत तो फोटो फेटाळून लावला आहे.

भारत बायोटेकने अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये, अद्याप अशाप्रकारची कोणतीही चाचणी करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.

त्याशिवाय व्हायरल होत असलेला हा फोटो रक्त घेतानाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचा फोटो, मेसेज भारत बायोटेकने प्रसारित केला नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.