३७ वर्ष ‘बाल गोपाळाची’ सेवा करणाऱ्या पुजाऱ्याची मूर्तीचा हात तुटल्याने झाले ‘हे’ हाल; तुम्हीही व्हाल चकित

आग्रामध्ये एक पुजारी ‘बाल गोपाळ’ची मूर्ती घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि हे प्रकरण चर्चेत आले. खरं तर, शुक्रवारी लेख सिंह नावाचा पुजारी ‘भगवान श्रीकृष्ण’च्या मूर्तीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेला होता.

रिपोर्टनुसार, सकाळी ‘बाल गोपाळ’ ला आंघोळ घालताना मूर्तीचा हात चुकून तुटला. या घटनेने पुजाऱ्याला खूप दुःख झाले. अशा स्थितीत मूर्तीच्या उपचारासाठी ते जिल्हा रुग्णालयात पोहोचले असता, तेथील स्टाफ आश्चर्यचकित झाला. मात्र, पुजाऱ्याच्या भावना समजून डॉक्टरांनी मूर्तीच्या तुटलेल्या हाताला पट्टी बांधली.

या पुजाऱ्याचा ‘बाल गोपाळ’च्या मूर्तीसोबत रडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की पुजारी सकाळी 9 वाजता रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी कर्मचार्‍यांना मूर्तीच्या हातावर पट्टी बांधण्याचा आग्रह केला.

पुजाऱ्याने सांगितले की, मी सकाळी ‘बाल गोपाळ’ ला आंघोळ घालत असताना माझ्या हातातून मूर्ती निसटली आणि हात तुटला. यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आणि मी मूर्तीला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले.

जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अध्यक्ष डॉ. अशोक कुमार अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना रुग्णालयातून माहिती मिळाली होती की, एका पुजार्‍याने तुटलेल्या हाताची मूर्ती आणली होती आणि तो त्याच्यावर उपचार करण्यासाठी रडत होता.

पुजाऱ्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी ‘श्री कृष्णा’च्या नावाने मूर्तीसाठी नोंदणी केली आणि पुजाऱ्याच्या समाधानासाठी मूर्तीला पट्टीही बांधली, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी पुजारी म्हणाले की, रुग्णालयात माझी विनंती कोणीही गांभीर्याने घेतली नाही. मी आतून तुटून पडलो, आणि मी माझ्या देवाचा धावा करू लागलो. ते पुढे म्हणाले की, अर्जुन नगर येथील खेरिया मोड येथील पटवारी मंदिरात गेल्या ३५ वर्षांपासून पुजारी आहे.

महत्वाच्या बातम्या
पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या NCB अधिकाऱ्यांना तुरूंगात टाका – शिवसेना
पोलीस भरती परीक्षेत कॉफी बहाद्दरांची अनोखी शक्कल, चक्क मास्कमध्येचं बसवले इलेक्ट्रोनिक डिव्हाईस, पाहून पोलीसही हैराण
कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेने मारली बाजी; राणेंचा दारूण पराभव करत केला सुपडा साफ
मोदी सरकार दोन मोठ्या सरकारी कंपन्यांची विक्री करण्याच्या तयारीत, नावे वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.