Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी टाकला सर्वात मोठा डाव! फक्त ठाकरे गटच नव्हे तर अख्ख्या मविआला फुटला घाम

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत 40 आमदार बाहेर पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. या तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली. शिवसेना पक्षाचे नाव गोठवण्यात आले. शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण चिन्हही ठाकरे गटाला गमवावे लागले.

तर दुसरीकडे शिंदे गट ठाकरे गटाला नव नवीन धक्के देत आहे. राज्यातील पक्ष संघटना, नगसेवक यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न शिंदे गट करत आहे. यात त्यांना चांगले यश पण मिळालेले आहे. पण आता शिंदे गट मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे.

शिंदे गटाची ही खेळी यशस्वी झाली तर उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे.

या पोटनिवडणुकीला मुंबई महानगर पालिका निवडणूकीआधीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे दोन्ही गटाने या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई केले आहे. तसं पाहिलं तर या निवडणुकीत शिंदे गट थेट लढतीत उतरणार नाहीये. शिंदे गट आणि भाजपने या निवडणुकीत युती केली आहे.

या निवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. पण त्यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गट ही निवडणूक लढवणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके या निवडणूक लढवणार आहेत.

पण आता शिंदे गटाने ऋतुजा लटके यांनाच आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ऋतुजा लटके यांनी अद्याप आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे शिंदे गट त्यांना आपला उमेदवार बनवू इच्छित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानभूतीचा फायदा ठाकरे गटाला मिळणार नाही. जर ऋतुजा लटके शिंदे गटात सहभागी झाल्या तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल.

महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : महापालिका निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी जाहीर केला ‘हा’ निर्णय
विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधवांचा पाय खोलात; ‘या’ केसमध्ये पोलिसांनी केली कठोर कारवाई
Eknath Shinde : मतदार म्हणून आम्हाला काही किंमत नाहीये का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now