शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाचे नाव देखील ठरवण्याचे आल्याचे सांगितले जात आहे.(The Governor will now step in to resolve the power crisis in Maharashtra)
शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. तसेच भाजपच्या कोअर कमिटीची देखील आज बैठक होणार आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या देखील दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी चालू आहेत. यादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना झाला होता. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच सक्रिय होतील, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला घटनात्मक पेच लवकरच सोडवला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेकडून १२ बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने भरत गोगावले आणि बच्चू कडू यांची प्रवक्तेपदी निवड केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी चर्चा करण्यासाठी शिंदे गटाकडून एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे. या शिष्टमंडळात शिंदे गटातील शंभूराज देसाई, बच्चू कडू, दादा भुसे आणि भरत गोगावले अशा काही महत्वाच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज एक महत्वाची बैठक देखील झाली आहे. या बैठकीत गटाच्या नावासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. या गटाचे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून ठेवण्यात यावे, असा निर्णय शिंदे गटाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..
VIDEO: भीषण अपघातानंतरही उभा राहून करू लागला विचित्र गोष्टी, लोकं म्हणाले, ‘भूत शिरलं आहे वाटतं’
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा; म्हणाले, ते माझ्या सख्ख्या भावासारखे…