‘सरकार आर्थिक अडचणीत, पण कोणत्याही परीस्थीतीत सारथी संस्था बंद पडू देणार नाही’

पुणे | राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्यातील वेतन देण्यासाठी सरकारला कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते अशी चिंता मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील अत्यावश्यक सेवा, कोविड योद्ध्यांच्या वेतनात कपात होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्यामुळे सारथी संस्थेलाही फटका बसत आहे पण कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्था बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.