Haryana : हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत २२ वर्षीय हिंदू महिला आणि तिच्या मुस्लिम पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीने नुकतेच एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले होते आणि जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला होता.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी एसजीएम नगर पोलिस ठाण्यात सर्व नऊ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. एसजीएम नगर येथील रहिवासी असलेल्या धीरज शुक्ला यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मोठी मुलगी संस्कृती शुक्ला एका खासगी बँकेत काम करते आणि तिचे लग्न एका मुस्लिम व्यक्तीशी झाले आहे.
पोलिस तक्रारीत महिलेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “गेल्या वर्षी जावेदची आई आणि नातेवाईक माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते, पण मी ते नाकारले.” या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी मला न्यायालयाची नोटीस मिळाली की, ज्यात लिहिले होते माझ्या मुलीचे जावेद खानसोबत लग्न झाले आहे आणि तिने संरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महिलेच्या वडिलांनी रोधी कानूनचा हवाला देत म्हणाले “कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,” पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीनंतर संस्कृती शुक्ला, तिचा पती जावेद खान, जावेदचा भाऊ फिरोज खान, वडील लियाकत अली, आई पायल, लग्नाचा साक्षीदार इर्शाद, काझीची भूमिका करणारा मोहम्मद अब्दुल साजन आणि नोटरी ईश्वर प्रसाद यांना अटक करण्यात आली.
हरियाणा बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरण प्रतिबंध कायदा, 2022 च्या कलमांखाली त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. इन्स्पेक्टर संदीप धनखर म्हणाले, “तक्रारीनुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत. चौकशी सुरू असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
..म्हणून अकलूजच्या दोन जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलासोबत विवाह; अखेर खरे कारण आले समोर
shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय
pune : ट्रकच्या धडकेत संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पुणे हादरलं






