Homeइतरपोटची पोरगी मारहाण करते, मला संरक्षण द्या ! वृद्ध बापाची न्यायालयात धाव

पोटची पोरगी मारहाण करते, मला संरक्षण द्या ! वृद्ध बापाची न्यायालयात धाव

एरवी जमीन इस्टेटीसाठी मुले आई वडिलांच्या विरोधात कोर्टात जातात आणि आपल्या हक्कासाठी भांडतात. मात्र पहिल्यांदाच एका वृद्ध पित्याने आपल्या मुली विरोधात थेट न्यायालयात दाद मागितली आहे. प्रकरण जरी विचित्र असले तरी खरे आहे. एका वृद्धाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुलीविरुद्ध न्यायालयात जाण्याचे निश्चित केले आहे.

आपण वडिलांनी मुलीला मारल्याचं आजपर्यत ऐकलं होतं मात्र आता चक्क मुलगी मारतेय म्हणून वडिलांना कोर्टात धाव घ्यायला लागल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात वडिलांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयातमध्ये स्वत:ची मुलगीच आपल्याला मारहाण करते म्हणून एका 68 वर्षांच्या व्यक्तिने संरक्षणासाठी धाव घेतली आहे.

यावेळी वडिलांनी मुलीवरती गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, माहेरी आलेली मुलगी आपल्याला तसेच आपल्या पत्नीला आणि दुसऱ्या मुलीला सतत मारहाण करते. त्यामुळे या मुलीपासून आपल्याला संरक्षण मिळावं. दरम्यान वृद्ध पित्याच्या मुलीनेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची कल्पना पोलिसांनी सुनावणीवेळी कोर्टामध्ये दिली.

वृद्ध पित्याने मुलीवर मारहाणीचा आरोप केला आहेच शिवाय मुलीच्या मारहाणीपासून संरक्षण मिळावं, अशी मागणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. याचिकाकर्त्या वृद्धाची मुलीचं लग्न झालेलं आहे मात्र ती पतीचं घर सोडून माहेरी येऊन राहिली आहे. कौटूंबिक कलहामधील हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या वृद्ध व्यक्तिच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने तपास अधिकाऱ्याला आदेश दिले की, बीट कॉन्स्टेबल आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक या गृहस्थांना उपलब्ध करून देण्यात यावा. पूर्ण निकाल लागण्यापपूर्वीच या केसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वडील आणि लेकीच्या या भांडणात न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

वडिलांनी आपल्या तक्रारीमध्ये मुलगी आपल्या पत्नीला देखील त्रास देत असल्याचा उल्लेख केला आहे. एरवी आपल्या मुलापेक्षा आपली मुलगी आपल्यावर जास्त प्रेम करते असं तिच्या पित्याला कायम वाटत असत मात्र याठिकाणी पूर्ण उलटे झाले आहे. वडिलांनी दिलेल्या या तक्रारीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत मात्र कोर्ट आता या प्रकरणाचा निवाडा कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या
मोठी बातमी! पंकजा मुंडेंसाठी खुर्ची सोडू; पवारांची जाहीर आॅफर
माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेनेनला ‘जय महाराष्ट्र’ करणार ? ‘या’ बड्या नेत्याच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब?
ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या एका ट्रान्सेक्शनसाठी किती लागणार पैसे?
मोठी बातमी! कोरोनाने ‘या’ राज्यात केला कहर; शाळा-कॉलेज बंद, मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड