एकाचवेळी ४ मुलांसोबत मुलीचं होतं लफडं, बापाला समजताच घडला ‘हा’ प्रकार

अहमदाबाद | गुजरातमध्ये एक असा प्रकार घडला आहे. जो वाचून तुम्ही चक्रावून जाल. अहमदाबाद शहरातील 20 वर्षाच्या मुलीचे एक दोन नव्हे तर तब्बल चार मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अनेक दिवस रिलेशनमध्ये राहिल्यावर चार बॉयफ्रेंडपैकी एका मूलाने त्या मूलीचा भंडाफोड केला आहे.

मुलीचं चार मुलांशी अनैतिक संबंध आहेत. मुलाने मुलीच्या वडिलांना फोनवरील संभाषण, चॅटिंग, फोटो दाखवले. हा सर्व प्रकार पाहून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनचं सरकली. त्यांनी हा प्रकार कुणालाही न सांगता मुलीला यातून बाहेर काढायचं ठरवलं.

मुलीला न रागवता, मुलीचं नाव खराब होऊ नये म्हणून वडिलांनी मुलीला समजवण्यासाठी एका संस्थेची मदत घेण्याचं ठरवलं. त्यानूसार त्यांनी पोलिस मार्गदर्शन केंद्रासमोर सर्व प्रकार सांगितला. त्यांनी त्यांची बाजू ऐकत मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी तात्काळ अभयम संस्थेला मुलीच्या घरी पाठवले.

अभयम संस्था तात्काळ त्या मुलीच्या घरी पोहोचली. संस्थेमधील महिला कर्मचाऱ्यांनी अगदी प्रेमाने मुलीला विश्वासात घेऊन सुरू असलेला प्रकार चुकीचा असल्याचं सांगितलं. मुलीनेही महिलांचं ऐकून मुलांसोबत असलेले संबंध तोडत असल्याचं सांगितलं.

मुलीने लगेच तिच्या मोबाईलमधील मुलांचे फोन नंबर, मेसेज डिलीट करून टाकले आहेत. तसेच मुलीच्या वडिलांनाही झालं गेलं विसरून जाऊन मुलीला रागावू नका, तिच्याशी प्रेमाने बोला. असं सांगितलं आहे.

अभयम संस्था ही महिलांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम करत असते. अन्याय, छळ, अत्याचार झालेल्या महिलांच्या मदतीसाठी संस्था काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेब ठाकरेंच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी रूग्णालय उभारा – इम्तियाज जलील
गरीब मुलांच्या स्वप्नांसाठी संघर्ष करणारी धनश्री आता कोमात मृत्यूशी झुंजतेय; तिला मदत करा
सहाच्या सहाही बहिणी झाल्या पोलिस; फडकवला घराण्याचा झेंडा
एटीएम फोडायला गेलेल्या चोराला एटीएममध्येचं टाकलं कोंडून; वसईच्या रणरागिनीचा पराक्रम

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.