उद्धव ठाकरे, आता कुठे खेळ सुरू झालाय…सुटकेनंतर अर्णब कडाडला

दिल्ली | बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळाला आणि त्यांची तुरूंगातून सुटका झाली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने मुंबई पोलिसांनी घरात घुसून त्यांना अटक केली होती.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ते कारागृहातून बाहेर पडले. त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. कारागृहा बाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली होती.

अर्णब गोस्वामी पुन्हाआपल्या रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरूममध्ये पोहोचले आणि त्यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत उभे राहून अर्णब गोस्वामी म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही हरला आहात.

पुढे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरसुद्धा टीका केली. पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे तुम्ही मला एक जुन्या खोट्या केसमध्ये अडकवून तुरुंगात टाकले आणि माझी माफीही नाही मागितली. खेळ तर आता सुरू झाला आहे”.

“आता मी प्रत्येक भाषेत माझा चॅनेल सुरू करणार आहे आणि माझा चॅनेल आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार आहे. जर मला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले तर मी तुरुंगाच्या आतून माझा चॅनेल सुरू ठेवेन आणि उद्धव ठाकरे काहीही करू शकणार नाहीत”, असे ते म्हणाले. शेवटी अर्णब गोस्वामी यांनी जामीन दिल्याबद्दल हायकोर्टाचे आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.