ICICI बँकेच्या माजी मॅनेजरनेच बँकेवर टाकला दरोडा; असा आखला होता प्लॅन

विरार। विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी (29 जुलै ) रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या त्यापैकी एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.

मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बँक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचा माजी मॅनेजर आहे. नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बँक बंद झाल्यावर इतर कर्मचारी निघून गेले तर बँकेच्या असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या.

याचवेळी दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला या दरोडेखोरांमध्ये माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले. त्यावेळी लगेच न श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली.

त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. या दरोड्यामध्ये अनिल दुबे याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.

मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँकेतील आरडाओरडा पाहून काही जिगरबाज तरुणांनी आरोपीला बॅगेसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घडलेल्या घटनेनंतर आज मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पण सुरक्षा रक्षक जर बँकेसमोर असते तर एवढी मोठी घटना घडली नसती.

या हल्ल्यात बँकेच्या असिस्टंट मॅनेजर योगिताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे श्रद्धावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. व मृत योगिता व श्रद्धाच्या घरच्यांनी अनेक प्रश्न व संताप व्यक्त केला आहे. आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अ‍ॅक्सिस बॅंकेचा मॅनेजर आहे.

आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता आरोपीला 6 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
मोदी म्हणतात, ‘मी चहावाला’; मात्र ‘ते चहावाले नाहीत’ म्हणत भाऊ प्रल्हाद मोदींचा मोठा गौप्यस्फोट
इंडिअन आयडल १२: अनु मलिक यांना डेडिकेट होणार ग्रैंड फिनाले थीम; जाणून घ्या काय काय घडणार….
विचित्र पण खरे! या विधीनंतर लग्नानंतर तीन दिवस वधू-वराला शौचालयाला जाता येत नाही 
“आम्ही आधी शिवसैनिक, नंतर मंत्री, पक्षाने सांगीतलं तर जशास तसे उत्तर देऊन राणेंचे तोंड बंद करू”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.