मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
तसेच शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत,’ असे त्यांनी म्हंटले.
याचबरोबर ‘याची कल्पना आम्ही काहीच केली नाही. आम्ही सध्या पूर्णपणे शॉकमध्ये आहोत. प्रतिक्रिया देण्यालायक काही राहिलंच नाही. आम्ही हादरून गेलो आहोत.’ अशा शब्दांत दिगंत आमटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शीतल आमटे यांना का करावी लागली त्यांना आत्महत्या?
शितल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.
डॉ. शीतल आमटे यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले. डॉ. शीतल यांच्या फेसबुक लाइव्हनंतर समाजात गैरसमज पसरू नये म्हणून आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले होते.
२०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये डॉ. शीतल व त्यांचे पती गौतम यांनाही स्थान देण्यात आले होते. शीतल आमटे या सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी तर त्यांचे पती गौतम कराजगी अंतर्गंत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
स्व.बाबा आमटे यांनी सुरु केलेले अनेक उपक्रम बंद पडले आहेत, कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप, आनंदवनाच्या कारभारात कॉर्पोरेट संस्कृतीचा शिरकाव असे अनेक आरोप आनंदवनात होऊ लागले होते. मात्र, डॉ, शीतल आमटे यांनी वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावत त्यावर स्पष्टीकरणही दिले होतं. अजून मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
बीएचआर घोटाळा प्रकरणाचे पुरावे आहेत; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरामध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त, संशोधनातून खुलासा
३२ वर्षांपूर्वी! कॉंग्रेस सरकारला झुकवणाऱ्या रांगड्या नेत्याच्या एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी