Share

encounter : जागेवर न्याय! 5 वर्षाच्या मुलीवर नराधमाचे अत्याचार, महिला PSI ने तातडीने केला आरोपीचा एन्काऊंटर

encounter : हुबळी शहरात चिमुरडीवर झालेल्या अमानवी अत्याचारानंतर जनतेमध्ये निर्माण झालेल्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर, आरोपी रितेश कुमारचा(Ritesh Kumar)  पोलिसांनी एन्काउंटर(encounter) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार(rape) करून तिची निर्घृण हत्या(murder) केल्याप्रकरणी रितेश कुमारला पोलिसांनी अटक केली होती. रविवारी रात्री पोलिसांनी त्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेलं असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला केला.

एन्काउंटरची(encounter) घटना नेमकी कशी घडली?

रितेश कुमारला(Ritesh Kumar) घटनास्थळी नेण्यात आलं असताना, त्याने अचानक दगडफेक करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ला करत त्याने वाहनाचंही नुकसान केलं. यावेळी पीएसआय अन्नपूर्णा यांनी प्रथम हवेत गोळी झाडून इशारा दिला. पण तो न थांबल्याने, स्वसंरक्षणासाठी त्याच्या पायावर आणि पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला तातडीने किम्स रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

काय होती ही अमानवी घटना?

विजयनगर पोलीस ठाण्याच्या(Vijaynagar police station) हद्दीत राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह रविवारी एका पत्र्याच्या शेडमधील बाथरूममध्ये सापडला होता. तपासात समोर आलं की, आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवत तिचं अपहरण केलं, तिच्यावर बलात्कार(rape) केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली. मुलीची आई घरकाम करत असताना ही घटना घडली.

आरोपीबाबत माहिती

35 वर्षीय रितेश कुमार(ritesh kumar) हा मूळचा बिहारच्या(Bihar) पाटणा(Patna) येथील असून, हुबळीत कामानिमित्त वास्तव्याला होता. तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

पोलिसांनी दिली माहिती

हुबळी-धारवाडचे(Hubali city) पोलीस आयुक्त एन. शशी कुमार(N. shahi kumar) यांनी सांगितले की, “रितेश कुमारने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणासाठी करण्यात आलेल्या कारवाईत तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत झाला.”

जनतेत संताप आणि समाधान

या क्रूर घटनेमुळे संपूर्ण हुबळी शहरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी जोर धरत होती. पोलिसांच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
the-female-psi-immediately-encounter-the-accused

 

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now