तेरी मेरी यारी! विहिरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावली प्राणाची बाजी

सांगली | शेतकऱ्याचं शेतात राबणाऱ्या जनावरांवर किती प्रेम असतं याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यातील काळामवाडी येथे शेतकरी विहिरीच्या कडेला बैलाला धूवत असताना अचानक घाबरून बैलाने पाण्यात उडी मारली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मालकाने पाण्यात उडी मारत बैलाचा जीव वाचवला.

गावातील शेतकरी सखाराम पाटील बैलाला घेऊन धुण्यासाठी विहिरीवर घेऊन गेले. बैलाला धूवत असताना बैलाने पाण्यात उडी मारली. मात्र विहिर खोल असल्याने आणि पाणी जास्त असल्याने सखाराम यांना काहीच करता येईना. जवळचं असलेल्या त्यांच्या मुलाने थेट खोल विहिरीत उडी मारली.

बैलाच्या नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून त्याने बैलाचं तोंड पाण्याच्यावर उचलून धरले. तब्बल अडीच तास त्यांचा मुलगा बैलाचं तोंड पाण्यावर उचलून धरत पोहोत होता. सखाराम पाटील यांनी गावातील लोकांना याची माहिती दिल्यावर लोक विहिरीजवळ जमा झाले.

गावातील लोकांनी बैलाला बाहेर काढण्यासाठी खुप प्रयत्न केले पण त्यांना काही बैलाला बाहेर काढता येईना. अखेर जेसीबीच्या साहाय्याने बैलाला बेल्ट आणि दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. बैल सुखरूप विहिरीच्या बाहेर आल्याचं पाहताचं सखाराम पाटिल आणि त्यांच्या कुटूंबियांना आनंद गगनात मावेनासा झाला.
महत्वाच्या बातम्या-
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल
पठ्ठ्याने चांगल्या नोकरीला मारली लाथ;  पेरूची शेती करून यशाला घातली गवसणी
फडणवीसांच्या पत्नीचं व्हॅलंटाईन स्पेशल गिफ्ट; सोशल मिडियावर घालतंय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.