माझ्या परिवाराला तुझ्यामुळे सोडून जात आहे; आत्महत्येआधी अल्पवयीन मुलीचं भावूक करणारं पत्र

भागलपुर | प्रेम आंधळं असतं असं बोललं जात. प्रेमाला वयाची मर्यादा नसते. मात्र कधी कधी आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत संबंध बिघडल्यावर धक्कादायक घटना घडतात. बिहारच्या भागलपुर जिल्ह्यामध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली आहे.

जिल्ह्यातील सुल्तानगंज परिसरात शिवानी नावाची १७ वर्षाची मुलगी राहते. शिवानी आई वडिल, भाऊ बहिण यांच्यासह राहते. शिवानीच्या वडिलांचं घराच्या बाहेरचं किराणा मालाचं दुकान आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंघोळीच्या बहाण्याने शिवानी घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने गळफास लावून आत्महत्या केली.

शिवानी अंघोळीला बराच वेळ झालं गेली असल्याने तिची लहान बहिण पाहण्यास गेली. शिवानीला आवाज दिल्यानंतर आतून प्रतिसाद न आल्याने कुटूंबियांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता शिवानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. शिवानी आत्महत्येआधी चिठ्ठी लिहिली आहे.

आत्महत्येआधी शिवानीने प्रियकर कुणाल, मैत्रीण अमृता, तिचा प्रियकर अमन आणि कुटूंबाला एक भावूक करणारी सुसाईड नोट लिहिली आहे. सुसाईट नोटमध्ये तिने मैत्रीण अमृता आणि तिचा प्रियकर अमनमुळे आत्महत्या करत असल्याचं लिहलं आहे.

वाचा चिठ्ठीत काय म्हटलं आहे 

१६ फेब्रूवारी, २३ फेब्रूवारी आणि १२ मार्च हे तीन दिवस मला खुप वाईट गेले. अमृता मी माझ्या प्रियकराला आणि परिवाराला फक्त तुझ्यामुळे अमनमुळे सोडून चालले आहे. तुझ्यामुळे माझ्यावर सगळेजण संशय घेत आहेत.

पुढे म्हणाली, जान मी व्यस्त नव्हते. माझा फोन मी अमृताला दिला होता तिचा प्रियकर अमनला बोलायला. मी तुझी आहे तुझीच राहणार. आय लव यु. मी तुझ्यावर खुप प्रेम करते.

माझा प्रिय परिवार, मी कुणालवर खुप प्रेम करते. तुम्हाला तो आवडत नव्हता. पण मला संपुर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खुप त्रास दिला आहे ना. आता नाही देणार. सर्व जण खुश राहा. आय लव यु, तुमची शिवानी, बाय..

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज येथे पाठवला आहे. शिवानीने टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
५० रूपये महिन्याला पगार असणारा व्यक्ती कसा बनला टाटा स्टीलचा चेअरमन, वाचा यशोगाथा
सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!
पत्नीचे होते गस्तीवरील पोलीसाशी लफडे, रोज पतीला दुधातून द्यायची झोपेच्या गोळ्या, एकदा झालं असं..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.