मुंबईतून ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी चौकशीत केले धक्कादायक खुलासे, म्हणाले..

मुंबई। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट पाकिस्तानी समर्थक अतिरेक्यांनी आखला होता, मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी समर्थक अतिरेक्यांचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी ६ अतिरेक्यांना अटक केली आहे.

त्यात महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेश याठिकाणाहून अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता याचसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेत अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याच्याबाबत मोठी माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांनमध्ये एक दहशदवादी हा मुंबईचा असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे.

मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. जान मोहम्मदच्या कुटूंबियांनची चौकशी केली असता त्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “जान मोहम्मदने काही दिवस वाहनचालक म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला पतीच्या अचानक जाण्यावर संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला. अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. ६ संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
माफी मागा अन्यथा जिथे दिसेल तिथे वंगण फासू; राष्ट्रवादीच्या महिला प्रवीण दरेकरांवर आक्रमक
सोनू सूदच्या ६ मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड; लोकांच्या मदतीला सोनूकडे पैसे आले कुठून?, आयटीचा प्रश्न
मोठी बातमी! ठाकरे सरकारने केला चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त, कोकणाला दिले ३ हजार कोटींचे पॅकेज
‘राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.