श्रीमंत आणि गरीब यातील दरी कमी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ही दरी कमी होताना दिसत नाही. देशातील गरिबींची संख्या अजूनही कोटींमध्ये आहे. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर किंवा खाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. याच जिवंत उदाहरण समोर आले आहे.
आजच्या काळात सोशल मीडिया (social media) हे व्यक्त आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे. पण यामध्ये काही फोटो आणि व्हिडिओ (video) लोकांच्या मनाला भिडतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये मोठा भाऊ छोट्या भावाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट करावे लागत आहे. अशाच कष्टकरी आणि गरीब घरातील मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलं अत्यंत गरिबीत जगत आहेत.
ती मुल आपल्या गरिबीतून जमले तसे प्रयत्न करुन वाढदिवस साजरा करत आहे. लहान भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यासाठी या मुलांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मोठा भाऊ भाकरीवरच दोन मेणबत्त्या लावून वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भरून आले आहेत.
सध्या सोशल मीडियावर युजर्स हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठा भाऊ भाकरी हातामध्ये घेऊन त्यावर मेणबत्ती पेटवून भावाचा वाढदिवस साजरा करत आहे. या व्हिडिओने अनेक नेटकर्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भावूक होऊन युजर कमेंट करत आहे. एका युजरने लिहीले की, सुखासाठी पैसा महत्वाचा नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण शुभेच्छा देत असताना दोन भावांमधील प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावत आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत १३ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर ५४ हजारांहून अधिक व्ह्यूज आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
फक्त ७५ घरे असलेल्या ‘या’ गावाने देशाला आजवर दिलेत ४७ IAS आणि IPS अधिकारी; वाचा त्या गावाची भन्नाट स्टोरी
राष्ट्रवादीने केला उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम! शिवसेनेचा मोठा नेता फोडत पाडले खिंडार