आईच्या पार्थिवास अग्नी देण्यास इंजिनिअर मुलाने दिला नकार; शेवटी जे झाले ते ऐकून धक्का बसेल

अकोला |  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाने आजवर अनेकांनी जीव गमावले आहेत. कोरोनामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनामुळे लोकांची जीवनशैलीचं बदलून गेली आहे.

कोरोना महामारीची भीती अनेकांच्या मनात आहे. अनेकांनी कोरोनाला घाबरूनच जीव सोडले आहेत. कोरोनामुळे कुणी आईवडिल गमावले आहेत. तर कुणी तरूण मुलांना गमावले आहे. कोरोनाने संपुर्ण कुटूंबही हिरावले आहे.

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जवळच्या काही व्यक्तींना अंत्यसंस्कारास येण्याची परवानगी देण्यात येते. पीपीई किट, मास्क घालून अंत्यसंस्कारास जावे लागते. अंत्यसंस्कार महापालिकेचे कर्मचारीच करत असतात.

कोरोनाने माणसामध्ये दरी निर्माण केली आहे. माणसामध्ये माणूसकीचं राहिली नसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अकोल्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका इंजीनियर मुलाने चक्क जन्मदात्या आईच्या मृत्यूनंतर तिला मुखाग्नी देण्यास नकार दिला आहे.

एका ६० वर्षीय वृध्द महिलेला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू होते. याकाळात महिलेच्या मुलाने, नातेवाईकांनी महिलेची प्रकृती कशी आहे. याबाबत चौकशीही केली नाही.

महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. महिलेची प्रकृती खालावत चालली होती. अखेर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. वृध्देच्या मृत्यूनंतर महिलेच्या मुलाला, नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने कळवलं.  महिलेचे कुणीही नातेवाईक नसल्याने मृतदेह  रुग्णालयात पडून होता.

महिलेचा मृतदेह मोहता मिल  स्मशानभूमीत नेण्यात आल्यानंतर स्मशानभूमीत वृध्द महिलेचे नातेवाईक उपस्थित नव्हते. यामुळे  महिलेच्या मुलाला बोलावण्यास एका कर्मचाऱ्याला पाठवले. महिलेच्या मुलाने थेट आईच्या अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला.

तसेच मुलाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना एक पत्र  लिहिले.  यामध्ये तो म्हणाला की,  मी आईच्या अंत्यसंस्काराला आलो तर मलाही कोरोना होईन. यामुळे मी आईला मुखाग्नी देण्यास येऊ शकत नाही. महानगरपालिकेनेच आईवर अंत्यसंस्कार करावे.

महिलेवर संध्याकाळ होत आली तरीही अंत्यसंस्कार झाला नाही. अखेर आरोग्य अधिकारी प्रशांत राजूरकर यांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. अधिकाऱ्याच्या या कार्याचे कौतूक होत आहे.

आई आणि मुलामध्ये प्रेमळ नाते असते. मुलाला जन्म दिल्यानंतरही आईची जबाबदारी संपत नाही. आपल्या मुलाने मोठं नाव कमवावे असं प्रत्येक आईला वाटते. मात्र कोरोनामुळे आई आणि मुलाच्या नात्यातही प्रेम ठेवले नाही.

महत्वाच्या बातम्या-
‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण
याला म्हणतात जुगाड! बाईने प्रेशर कुकरमध्ये दोन मिनिटांत बनवल्या चपात्या, पहा व्हिडिओ
…म्हणून शाहरुख खानच्या मुलीला डेट करण्याचे धाडस कोणी करत नाही; शाहरुख खानने सांगितले डेटचे सात रुल

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.