कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या शुन्यावर आल्याने कर्मचाऱ्याने लावणीवर धरला ठेका; पाहा व्हिडिओ

लातूर | कोरोनाची लाट आल्यापासून देशातील आरोग्य कर्मचारी, नर्स, डॉक्टर, पोलिस कर्मचारी दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठी काम करत आहेत. रुग्णांची कुटूंबातील व्यक्ती प्रमाणे सेवा करत असल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या कोरोना योध्यांचे देशभरातून कौतूक होत आहे.

नर्स, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असतात.  कामातून वेळ काढून डॉक्टर,  कर्मचारी आनंदात  डान्स, गाणे म्हणत असतात. सोशल मिडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

काही दिवसांपुर्वी एका रुग्णवाहिका चालकाचा वरातीतील डान्स सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता अशाच एका आरोग्य कर्मचाऱ्याचा  डान्स तुफान व्हायरल झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा डान्स पाहून युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत

लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना संकटांचा सामना करावा लागत आहे. सरकारी रुग्णालय, कोविड सेंटर, खाजगी रुग्णालय रुग्णांमुळे भरली आहेत. जिल्ह्यामधील समाज कल्याण कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती.

मात्र अनेक दिवसांतुन या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या शुन्यावर आली आणि इथे काम करणाऱ्या निलेश हांकारे नावाच्या कर्मचाऱ्याला खुप आनंद झाला. रोज कामातून वेळ भेटत नव्हता आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने निलेशने पीपीई किट घालूनच दिसला गं बाई दिसला लावणीवर ठेका धरला.

निलेशने ठेका धरण्यास सुरूवात केल्यावर तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये डान्स शुट केला. बघता बघता निलेशचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. सोशल मिडियावर निलशच्या लावणीने धुमाकूळ घातला आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ते अगदी खर; पहा उर्मिला कोठारे आणि चिमुरड्या जीजाचा डान्स
सचिन तेंडूलकरला टाकली एक ओव्हर अन् त्या बॉलरचे अख्खे करियर झाले उध्वस्त; पहा व्हिडिओ
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.