आपला देश प्रतिभांनी परिपूर्ण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज कोणत्या ना कोणत्या प्रतिभावान व्यक्तीची कहाणी समोर येत असते. अशीच एक कहाणी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आली आहे, ज्याने सिद्ध केले आहे की, तुमच्या आजूबाजूच्या अडचणीं कधीही यशाच्या मार्गात येत नाही. आपली इच्छाशक्ती आपल्या मार्गातील प्रत्येक अडचणीवर मात करून आपले ध्येय गाठते. बिहारमधील नंदलाल या दिव्यांग विद्यार्थ्याने ही गोष्ट सिद्ध केली आहे. जाणून घ्या त्याची कहाणी.
मुंगेर जिल्ह्यातील हवेली खरगपूर नगर भागातील संत टोला येथील रहिवासी असलेल्या नंदलालने आपले दोन्ही हात गमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी विजेचा झटका लागल्याने त्यांचे दोन्ही हात कापण्यात आले होते. मात्र, यामुळे त्यांचा प्रवास तिथेच थांबला नाही. नंतर नंदलालच्या आजोबांनी त्याला धीर दिला आणि पायाने लिहायला शिकवले.
नंदलाल सध्या मुंगेरच्या आरएस कॉलेजमध्ये बीएची परीक्षा देत आहे. इथूनच त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. तो पायाने लिहून प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वजण त्याच्या धाडसाला सलाम करत आहेत.
आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही नंदलाल आपले मनोबल जपत आहेत. बीए केल्यानंतर बीएड आणि त्यानंतर आयएएस होण्याचे स्वप्न पाहत आहे. २०१७ मध्ये त्याने मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये विज्ञान शाखेतून १२वीची परीक्षाही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. आता तो अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन करत आहे.
सामान्यतः अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस आपले जीवन संपवण्याचा विचार करतो. पण नंदलालने आपल्या अपंगत्वाला कधीही आपली लाचारी होऊ दिले नाही. त्याने हिंमत गमावली नाही आणि आयुष्यात काहीतरी करण्याचा निर्धार केला आहे. नंदलालच्या या धाडसाला आमचाही सलाम.
महत्वाच्या बातम्या-
KBC मध्ये 5 कोटी जिंकून रातोरात श्रीमंत झाला होता हा व्यक्ती, आता झाली आहे अशी अवस्था
दहावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश होऊ नका, तज्ञांकडून जाणून घ्या ११ वीला कोणती शाखा घ्यायची
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात
खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला