डोळ्यादेखत रुग्ण जीव सोडताहेत, आम्हाला काहीच करता येत नाही; फेसबूक लाईव्हमध्ये डॉक्टर ढसाढसा रडले

कोलकाता | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. रुग्णांचा अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असल्याने देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून रुग्णांसाठी धडपडत आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करूनही रुग्णांचे जीव गेल्यावर डॉक्टरांनाही जबर मानसिक धक्का बसत आहे.

डॉक्टर नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत असतात. कोरोनाची लाट आल्यापासून संशोधक, डॉक्टर, वैज्ञानिक कोरोनाबाबत कशी काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करत आहेत. असचं फेसबूक लाईव्हद्वारे मार्गदर्शन करत असताना कोलकत्यातील एका डॉक्टरला रडू कोसळले आहे.

डॉक्टर अनिर्बन विश्वास असं त्या डॉक्टरांंच नाव आहे. फेसबूक लाईव्हमध्ये ते म्हणाले की, कोरोनाची लक्षणे दिसून येताच लगेच तपासणी करून घ्या. कोरोना पासून वाचण्यासाठी सरकारने नियम घालून दिले आहेत त्याचे पालन करा. अशी हात जोडून विनंती त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाची परिस्थीती भयंकर आहे. रुग्णांवर उपचार वेळेवर होत नाहीत. रुग्णांचे जीव वाचवण्यास अपयश येत असल्याने खुप दु:ख होत आहे.रुग्ण आमच्या डोळ्यादेखत जीव सोडत आहेत. पण आम्हाला काहीच करता येत नाही. असं म्हणतं डॉक्टर विश्वास दु:ख व्यक्त करत ढसाढसा रडले आहेत.

याआधीही अनेक डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना कित्येक संकटांचा सामना करावा लागत आहे याबद्दल सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी एका महिला डॉक्टरने कोरोना रुग्णाने मरणाच्या दारात असलेल्या आईबद्दलचे प्रेम गाणं म्हणतं व्यक्त केले होते. यामुळे ती महिला डॉक्टरही भावूक झाली होती.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ११ हजार १७० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४,०७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘मिस यू भाऊ’! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली; हजारोंची गर्दी
‘खतरों के खिलाडी ११’ ची राखीने केली भविष्यवाणी; सांगितले कोण आहे या सीझनचा विनर?
फोटोत दिसणारी ही चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना लावलाय वेड
रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.