मॉडेलच्या नाकावर बुक्का मारणाऱ्या डिलीव्हरी बॉयने पोलिसांना सांगितली भलतीच कहाणी

बंगळूरू | बंगळूरूमध्ये दोन दिवसांपुर्वी हितेशा चंद्राणी या मॉडेलने ऑनलाईन जेवण मागविले होते. पण डिलिव्हरी बॉयने जेवण उशीरा आणल्याने हितेशा आणि डिलिव्हरी बॉय कामराजन यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने हितेशा यांच्या नाकावर बूक्का मारला होता.

घटनेनंतर हितेशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत डिलिव्हरी बॉयला अटक केली होती. पोलिस तपासात कामराजनने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

हितेशा यांची ऑर्डर घेऊन मी त्यांना देण्यासाठी निघालो होतो. रस्त्यात ट्राफिक जाम झालं होतं त्यामूळे मला त्यांच्या घरी पोहचण्यास उशीर झाला. त्याबद्दल मी त्यांची माफी मागितली होती. मात्र तरीही हितेशा यांनी मला शिवीगाळ केली आणि ऑर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतली. मी त्यांना ऑर्डरचे पैसे मागितले असता त्यांनी मोठमोठ्याने गोंधळ घालत पैसे देणार नाही असं सांगितलं.

हितेशाने त्यानंतर मला चपलेने मारहाण करण्यास सूरूवात केली. मारहाण करताना मी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिचाच हात तिच्या नाकावर लागला आणि बोटातील अंगठी नाकावर लागून रक्त येऊ लागले.

हितेशा यांच्या फ्लॅटवर मी गेल्यावर मला कस्टमर सपोर्टरने हितेशा यांनी ऑर्डर कॅन्सल केल्याचं सांगितलं. मी हितेशा यांना ऑर्डर परत मागितली असता त्यांनी माघारी देण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनीच माझ्यासोबत हे कृत्य केले आहे आणि मी मारहाण केल्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला आहे.

दरम्यान या प्रकारानंतर झोमॅटो कंपनीने मॉडेल तरूणीची माफी मागितली होती. तसेच डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं. यानंतर तपासात डिलिव्हरी बॉयने पोलिसांना ही माहिती दिली असल्याने या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर लावली आग; पहा फोटो
गावच्या पोलिस पाटलावर हात उचलणे पडणार महागात, होणार ‘ही’ मोठी कारवाई
प्रेक्षकांचा निरोप घेताना ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम बबड्या झाला भावूक, म्हणाला…
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.