राम मंदीर कार्यक्रमातील वाद जीवावर बेतला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घूण ह.त्या

नवी दिल्ली | दिल्लीतील मंगोलपुरी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याची ह.त्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमधील एकाच्या पत्नीला मृ.त तरूणाने रक्तदान करून जीवदान दिले होते. परिसरात ह.त्येची घटना घडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दसऱ्याला राम मंदीर कार्यक्रमात रिंकू शर्माचा इस्लाम, मेहताब, दानिश, जाहिद यांच्याबरोबर वाद झाला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी रिंकूचा काटा काढण्याचं ठरवलं.

घटनेच्या दिवशी रात्री आरोपी हातात लाकडी दांडके चा.कू घेऊन रिंकूच्या घरासमोर जमा झाले. त्यानंतर घरात घुसून रिंकूला मा.रहाण करत त्याच्यावर ह.ल्ला केला. रस्त्यावर ओढत आणून त्याच्यावर वार केले. यात रिंकूचा जागीच मृ.त्यू झाला आहे.

दरम्यान ह.त्या झालेला रिंकू शर्मा हा परिसरातील बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. तो खूप लोकांची मदत करायचा. आरोपींमधील इस्लामची पत्नी गरोदर असताना त्याने रक्तदान करून तिचा जीव वाचवला होता. तर कोरोनामध्येही त्याने आरोपीच्या भावाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यास मदत केली होती.

मुलाच्या मृत्यूने परिवाराला बसला धक्का

रिंकू हा तीन भावांमध्ये मोठा होता. वडिल सतत आजारी असल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली होती. रिंकू हाच परिवाराचा आधार होता. मुलाच्या मृ.त्यूमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
साताऱ्याच्या कॉलेजमध्ये मुलींची दहश.त, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
भिमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींबद्दल अमेरिकन लॅबचा मोठा खुलासा; धक्कादायक माहिती झाली उघड
८० वर्षाच्या म्हाताऱ्याने केले २९ वर्षाच्या पत्रकार तरूणीशी लग्न; प्रश्न विचारणाऱ्यांना दिलंय ‘हे’ उत्तर
“पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.