सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ

सोलापुर | सोशल मिडियावर सोलापुरातील एका बकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्ह्यातील सांगोला तालूक्यातील चांडोलवाडी गावचे मेंढपाळ बाबूराव मेटकरी यांचा मोदी (सर्जा) नावाचा हा बकरा होता. मात्र आजाराने या बकऱ्याचे निधन झालं आहे.

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी येथील जनावरांच्या बाजारात या बकऱ्याला ७० लाखांची बोली लागली होती. मात्र मालक बाबूराव मेटकरी यांनी दीड कोटी रुपयापेक्षा कमी किंमतीत बकरा विकणार नसल्याचं सांगितलं होतं.

सर्जा बकरा हा दिसायला देखणा होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंदकेसरी नावाने ओळखले जायचे.  मालक मेटकरी स्वत:च्या मुलासारखा मोदी (सर्जा) बकऱ्याचा सांभाळ करत होते. सर्जा बकरा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

सर्जाला न्युमोनियाची लागण झाली होती. मालक बाबूराव मेटकरी यांनी सर्जाचा जीव वाचवण्यासाठी खुप धडपड केली. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर काल दि. २९ रोजी सर्जाचे निधन झाले आहे. सर्वांचा लाडका असलेल्या सर्जाच्या जाण्याने मेटकरी कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

सर्जा बकरा हा अडीच वर्षांचा नर होता. त्याच्या नाकाने त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. सर्जाची शरीरयष्टी  बाकीच्या बकऱ्यांपेक्षा वेगळी होती. सर्जा बकरा हा मेटकरी कुटूंबाचा जीव की प्राण होता.
महत्वाच्या बातम्या
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे आयुर्वेदीक औषध ठरतंय रामबाण उपाय; आयुष मंत्रालयाचा दावा
क्रिकेटचा देव पावला! मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडूलकरने केली १ कोटी रुपयांची मदत
भाजप नगरसेवकाची महीला आरोग्य अधिकाऱ्याला रडेपर्यंत शिवीगाळ; म्हणाला, आयता पगार घेता
कलेक्टरसाहेब डिसेंबरमध्येच लागले होते तयारीला; आता ना ऑक्सिजनची कमी ना बेडची

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.