दाभोलकर प्रकरण आताच्या सरकारमधील मोठ्या व्यक्तीने दाबलंय; आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

 

मुंबई | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला काल (गुरुवार) सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

तसेच नरेंद्र दाभोलकर प्रकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक व्यक्तव्यही केले आहे, दाभोलकर प्रकरण आताच्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीने दाबलंय, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी एकामागून एक ट्विट केले आहे.

आज डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होताय. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही तो लागणारही नाही.

राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण,आम्हाला तरी शंका आहे, की या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते, असे ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना, पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का ?
समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे.

या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखुन निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र आदरांजली, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.