माणसातील जनावर जागं झालं की त्याच्यातील विकृती समोर येते. माणसातील विकृतीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जवळील सरपतहा गावात अशीच एक विकृतीची घटना समोर आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, सरपतहा गावातील काही तरूणांनी ३१ डिसेंबर रोजी कॅनलमध्ये असलेल्या डॉल्फिनला पकडून अगदी क्रूरतेने काठी, लोखंडी रॉडने रक्तबंबाळ होई पर्यंत मारहाण केली. या हल्ल्यात डॉल्फिनला जीव गमवावा लागला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कॅनलच्या बाजूला डॉल्फिनचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या. गावातील लोकांना याबाबत विचारलं असता कोणीही मृत्यू कसा झाला हे सांगितलं नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, डॉल्फिनच्या या प्रजातीचा मासा देशात कमी प्रमाणात आढळून येतो. याच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने या डॉल्फिनला भारताचा ‘राष्ट्रीय जलचर प्राणी’ म्हणून घोषित केले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
मी आदर पूनावालाच्या ऐवजी बाबा रामदेव यांची लस घेणार; अभिनेत्याच्या ट्विटचा सोशल मीडियावर धुमाकूळ
बाळासाहेब थोरात म्हणतात, ‘संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत, पण…’
शेतकरी व सरकार यांच्यातील आठव्या फेरीतील बैठकही निष्फळ; सरकार म्हणालं…
बाबो! ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे तैमूर खानशी लग्न; म्हणाली ‘वाट पाहायला तयार आहे’