संकट काही संपेना! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन

मुंबई। देशात गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा डेल्टा व्हेरिंएटचा धोका वाढल्यानं जागतिक आरोग्य संघटनेकडून शुक्रवारी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच आता पुन्हा एक काळजीत टाकणारी माहिती समोर आली आहे. आता पुन्हा कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आला असून हा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक आहे.

हा कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. संशोधनातून ही माहिती समोर आली असून या नव्या डेल्टा व्हेरिएंटचा संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालावेत, असं आवाहन केलं आहे.

त्यामुळे “डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल व आपल्याला वेळीच सावध व्हावं लागेल असे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेनं सांगितलं.

यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये दररोज एक तर रुग्णसंख्या तरी वाढते आहे किंवा पॉझिटिव्हिटी दरही वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावध राहणं गरजेचं असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. “व्हायरस फिटर झाला आहे, व्हायरस वेगाने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

आधीच गेले वर्षभर कोरोनाने देशात थैमान घातले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे , त्यात आता आणखी नव्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या व आरोग्य यंत्रणेच्या काळजीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Bigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला शो मध्ये ‘न्यूड योगा’ची ऑफर; मात्र स्पर्धकानं केली ‘इतक्या’ लाखांची मागणी
मराठी शाळेतल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल…
नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा
नादच खुळा! साठी पार केलेल्या आजोबांनी बांधले डोक्याला पुन्हा बाशिंग; सर्वत्र आजोबांची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.