गुन्हेगारी कथा वाचून आणि क्राईम मालिका पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरण आपल्याला माहित असतात. पण पुण्यातून एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे पोलिस देखील हैराण झाले आहेत. पुणे पोलिसांनी एका अशा गुन्हेगाराला अटक केली आहे, जो आधी गुन्हा करायचा आणि मग त्या गुन्ह्याची कथा लिहायचा.(The crime committed by the writer for writing the story of the film)
हायप्रोफाईल महिलांशी संबंध प्रस्थापित करून देतो, असे सांगत त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो अशाप्रकारे लोकांना फसवत आहे. या आरोपी लेखकाचे नाव अनुप मनोरे असं आहे. त्याने पुण्यातील एका ७६ वर्षाच्या व्यवसायिकाला तब्बल ६० लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या सराईत गुन्हेगाराची कथा फार वेगळी आहे. या गुन्हेगाराची दोन भिन्न रूपे आहेत. एकीकडे तो मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिखाण करणारा एक लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. त्याने काही नाटकांमध्ये देखील कामे केली आहेत. हिंदी रंगभूमीवरील ‘रंग रसिया बालम’ या नाटकात त्याने भूमिका केली आहे.
चित्रपट सृष्टीतील एखाद्या यशस्वी कलाकाराप्रमाणे त्याचे आयुष्य आहे. पण त्याचे दुसरे रूप फारच भयानक असे आहे. शेरलॉक होम्स किंवा ब्योमकेश बक्षीच्या कथेप्रमाणे त्याची कहाणी आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याने गणेश शेलार असे खोटे नाव धारण केलं होत. या नावाच्या आधारे तो लोकांची फसवणूक करायचा.
‘एन्जॉय करा आणि हजारो रुपये कमवा’, ‘मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब’, ‘रोड टू हेवन’ या शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यायचा. ही जाहिरात पाहून फोन करणाऱ्या पुरुषांना हाय प्रोफाईल महिलांशी मिटिंग करून देतो असे सांगायचा. त्यानंतर एखाद्या महिलेचे व्हर्च्युअल अकाउंट तयार करून समोरच्या पुरुषाशी संपर्क साधायचा.
यामार्फत येणारे पैसे स्वीकारण्यासाठी तो एखाद्या महिलेच्या नावावर असलेल्या बँक अकाउंटचा उपयोग करायचा. हे सर्व करत असताना त्या बँक अकाउंटचे एटीएम कार्डचा तो स्वतः वापर करायचा आणि अकाऊंटमधून पैसे काढायचा. अखेर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासोबत पोलिसांनी दीपाली शिंदे नावाच्या महिलेला देखील अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नवाब मलिकांनंतर ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना: आता तुमचे पैसै होणार दुप्पट, वाचा कसा घ्यायचा लाभ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी धरला भारतीयाचा हात, दलीप सिंग यांना सोपवली मोठी जबाबदारी