Share

राणांच्या विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

बुधवारी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे, असं स्पष्ट मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवलं आहे. यावेळी निकाल देत असताना न्यायालयाने राज्य सरकारवर(State Government) आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.(The court slapped the Thackeray government in Rana case)

मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी यासंदर्भातील निकाल दिला आहे. राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठाण करणार होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलन न करण्यासाठी नोटीस दिली. ही नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्याने आंदोलनातून माघार घेतली होती.

राणा दाम्पत्य त्यांच्या खारमधल्या घरातून बाहेर निघाले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे, असे मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले आहे. तसेच राणा दाम्पत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोणत्याही ठिकाणी हिंसा घडली नाही, असे देखील न्यायालयाने नमूद केले आहे.

राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याना जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची भायखळा कारागृहातून आणि आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती.

त्यानंतर खासदार नवनीत राणा यांना प्रकृतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी नवनीत राणा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पती रवी राणांना पाहताच खासदार नवनीत राणा रडू लागल्या.

यावेळी आमदार रवी राणांनी खासदार नवनीत राणा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी रवी राणा यांना देखील अश्रू अनावर झाले होते. खासदार नवनीत राणा यांना बीपी, अंगदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील लीलावती रुग्णालयात जाऊन खासदार नवनीत राणांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या :-
एकमेकींच्या प्रेमात वेड्या झाल्या तरुणी, पोलिस ठाण्यात पोहचून घातला हायव्होल्टेज ड्रामा
मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
होय आमच्यात मतभेद आहेत, पण…; वसंत मोरेंनी पहिल्यांदाच दिली कबुली; पुढचा मार्गही सांगितला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now