Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना लवकरच अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवनीत राणा या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्या लव्ह जिहाद प्रकरणावरून प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यांनतर आता बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. तसेच याप्रकरणी त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे बोलले जात आहे.
बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा व त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यानंतर आता शिवडी न्यायालयाकडून नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनात्र वॉरंट काढण्यात आला आहे.
तसेच कोर्टाने मुलुंड पोलिसांना नवनीत राणांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवनीत राणांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
शिवडी कोर्टाच्या आदेशानंतर नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सत्र न्यायालयाने या प्रकरणावर कुठलीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे शिवडी कोर्टाने पोलिसांना नवनीत राणांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
कोर्टाच्या आदेशानुसार ७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता मुलुंड पोलीस नवनीत राणांना अटक करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Navneet Rana : खोटे जातप्रमाणपत्र! नवनीत राणांविरोधात कोर्टाचे कठोर आदेश, पोलिस अटक करणार?
Navneet Rana : लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या अंगलट, थेट पोलिसांत गेली तक्रार, वाचा तक्रारीत काय म्हटलंय?
नवनीत राणा तोंडावर पडल्या! मुलीचा पोलिसांना खळबळजनक जबाब; आता राणांनाच फुटला घाम
Navinit Rana : नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा आरोप निघाला खोटा, मुलीच्या जबाबाने राणा पडल्या तोंडघशी