Share

Navneet Rana : खोटे जातप्रमाणपत्र! नवनीत राणांविरोधात कोर्टाचे कठोर आदेश, पोलिस अटक करणार?

navneet

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा नवनीत राणा या अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाकडून त्यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करत निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याचा आधार घेत जात प्रमाणपत्र मिळवले असल्याची त्यांच्यावर तक्रार आहे. त्यामुळे मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात नवनीत राणा व त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा व त्यांच्या वडिलांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. या दोघांवर दोन महिन्यात दुसऱ्यांदा हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राणांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा लव्ह जिहाद प्रकरणावरूनही प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यांनी एका मुलीशी संबंधित लव्ह जिहाद प्रकरणावरून अमरावती येथील पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली होती. मात्र, ती मुलगी सापडल्यानंतर तिने लव्ह जिहाद वगैरे काही नसून आपण आपल्या इच्छेने घर सोडून गेलो असल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने राणांना चांगलेच सुनावले होते. तसेच संबंधित मुलीकडूनही नवनीत राणांवर आपली बदनामी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मागील काळात नवनीत राणांचे हनुमान चालीसेचे प्रकरणही प्रचंड गाजले होते.

त्यानंतर आता नवनीत राणा पुन्हा या नव्या वादात सापडल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर केला गेलेला आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती मिळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
Navneet Rana : लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या अंगलट, थेट पोलिसांत गेली तक्रार, वाचा तक्रारीत काय म्हटलंय?
नवनीत राणा तोंडावर पडल्या! मुलीचा पोलिसांना खळबळजनक जबाब; आता राणांनाच फुटला घाम
Navinit Rana : नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा आरोप निघाला खोटा, मुलीच्या जबाबाने राणा पडल्या तोंडघशी
Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर

 

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now