Share

Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं

Kirit Somaiya

Kirit Somaiya : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असलेले सुजीत पाटकर यांच्यावर आरोप केला होता. लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे कंत्राट मिळवून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

त्यानंतर त्यांच्याविरोधात मानहानी दावा दाखल करण्यात आला. फर्मने दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीत कोर्टाने सोमय्यांचे कान टोचले. सुजित पाटकर यांच्याशी संबंधित असलेल्या फर्मविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला हवी होती, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे.

संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी ‘लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. माहितीच्या अधिकारामार्फत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हा दावा केला होता.

याप्रकरणी कोर्टाने किरीट सोमय्या यांना सुनावले आहे. केवळ कागदपत्रांच्या आधारे गृहीतके मांडली जाऊ शकत नाही. किरीट सोमय्या यांनी एक जबाबदार व्यक्ती म्हणून कोणतेही विधान करण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट पडताळली पाहिजे, असे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी म्हणाले आहेत.

तसेच कोरोना जम्बो सेन्टर प्रकरणात संजय राऊत यांचे जवळीक असेल सुजित पाटकर आणि लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंटचे भागीदार यांच्या चौकशीची मागणी सोमय्यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात रुग्णालयाने मानहानी दावा दाखल केला होता.

या दाव्यात फर्मने कोरोनाकाळात पॅरा मेडिकल कर्मचारी, नर्सिंग कर्मचारी, आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी लॉजिस्टिकसह आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या असल्याचे म्हटले आहे. तसेच या फर्मला मुंबई महागरपालिकेच्या कोरोना उपचार केंद्रासाठी सेवा देण्यासंदर्भात पालिकेने कंत्राट दिले.

किरीट सोमय्यांनी या दाव्याचा विरोध केला आणि कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची नोंदणीदेखील करण्यात आली नव्हती. तसेच राजकीय नेत्यांशी फर्मच्या काही भागीदारांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना जम्बो सेंटरचे कंत्राट दिले असल्याचे किरीट सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे किरीट सोमय्यांनी हे आरोप केल्यामुळे ते पालिकेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. म्हणूनच फर्मविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी वस्तुस्थिती पडताळून पाहायला हवी होती, असे कोर्टाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : शिंदे सरकार अडचणीत सापडणार? माहिती अधिकारामार्फत धक्कादायक माहिती आली समोर
Shivsena : मोदी सरकारकडे बहुमत असूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घाबरते, शिवसेनेची जहरी टीका
Actress: ‘या’ चित्रपटाने उडवून दिली होती खळबळ, अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर दिला होता बाळाला जन्म
VIDEO: पार्टीत वारंवार करत होता चुकीचा स्पर्श, सोनाली फोगाट मृत्यु प्रकरणात ‘या’ व्यक्तीला अटक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now