पंडित नेहरूंपासून ते मनमोहनसिंग सरकारपर्यंतच्या पुण्याईवरच आजही देश तरलेला आहे- संजय राऊत

मुंबई | राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि केंद्रातील मोदी सरकारमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच रंगू लागतं. केंद्रात मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पुर्ण झाली आहेत.

यावरून मोदी सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षांकडून निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर सडकून टिका केली आहे. काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या पुण्याईमुळेच देशाचा कारभार सुरू आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, राहूल गांधी काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहेत. राहूल गांधी यांचं म्हणणं मोदी सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. मोदी सरकारला देशात ७ वर्ष पुर्ण झाली आहेत. सत्तेतील २ वर्ष कोरोना महामारीमध्ये गेले. देशासाठी आजून खुप काही करणं बाकी आहे.

आता देश जो चालत आहे. तो पुर्वीच्या ६० वर्षाचा लेखाजोखा त्याच पुण्याईवर देश चालत आहे. पंडीत नेहरूं पासून राजीव गांधीपर्यंत, नरसिंह रावपर्यंत यांच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही. आपण अपेक्षा करू शकतो.

अपेक्षा करायलाही पाहिजे. सरकारला लोकं निवडून देतात सरकारला विश्वास आणि बहूमतं मिळालं आहे आज देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे. देशातील कोरोना महामारी आजूनही कायम आहे. लोकांच्या मागण्या खुप कमी असतात.

देशातील सर्वांना अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं नाही. फक्त रोजगार पाहिजे. रोजीरोटी पाहिजे. हे जरी मिळालं तरी लोक खुश होतील. सरकारने आत्मचिंतन करायला पाहिजे. ७ वर्षात देशातील जनतेला हे सर्व मिळालं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्ष गेली आहेत. पंडीत नेहरूंपासून राजीव गांधीपर्यंत , नरसिंहराव  मनमोहनसिंग यांच्यापर्यंत आपण जर लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना प्रकल्प दिसत आहेत.

देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे. मागची सात वर्षे सुध्दा हे कोणालाही नाकारता येणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारकडे पुर्ण बहूमत आहे. लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून सत्तेत बसवले आहे.

दोन वर्ष कोरोनाशी लढण्यात गेली आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे नेतृत्वक्षमता उत्तम प्रकारे आहे. आजही आपन अपेक्षा करू शकतो की देशाला योग्य दिशा आणि जनतेला योग्य मार्ग दाखवतील. असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
नकली आयकार्ड बनवून अभिनेत्रीने घेतली कोरोना लस; धक्कादायक माहिती आली समोर
‘पुण्याची मैना’ या गाण्यावर डान्स करून श्वेता ताजणे सोबत धुमाकूळ घालतीये अजून एक मुलगी;पहा व्हिडिओ
मोदींनी केली मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार १० लाख रुपये आणि मोफत शिक्षण

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.