या गावात कोरोना रुग्ण शोधूनही सापडणार नाही; गावकऱ्यांकडे आहे भन्नाट औषध

झारखंड | कोरोनाने गेल्या वर्षभरापासून देशात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशात एक भीषण वातावरण निर्माण झालं आहे. देशात अत्यंत धक्कादायक तऱ्हेने रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

कोरोनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना घेरलं आहे. कुणी उपचार घेऊन बरं होऊन  घरी आलं आहे. तर कुणाचा उपचार सुरू असतानाचा जीव गेला आहे. घरातील  सदस्याच्या मृत्यूने  कुटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळत आहे.

मात्र देशातील असं एक गाव आहे जिथे गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. गावातील मंडळींनी यावर एक जालीम उपाय शोधून काढला आहे. चला तर मग जाणून घेऊया या गावाविषयी..

झारखंड राज्यातील घाटशिला डुमरिया ब्लॉकमध्ये बकुळचंदा हे डोंगराळ भागात गाव आहे. या गावात कोरोनाला थारा नाही. कारण गावातील लोक उन्हाळ्याच्या दिवसात ढेकीमध्ये लाल तांदुळ कुटून त्याचा भात बनवून खातात.

गावातील मंडळी म्हणतात,  लाल तांदुळ रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगला आहे. आम्ही शेण खत वापरून लाल तांदुळ पिकवतो. लाल तांदुळ ढेकी या यंत्रात कुटून गावातील सर्व लोक खातो. या तांदळात रोगावर प्रतिकार करण्याची क्षमता आहे. त्यामूळे गावातील प्रत्येकजण या लाल तांदळाची शेती करतो.

गावातील लोक तांदुळ पिकवून त्याची विक्री करूनही पैसे कमावतात. लाल तांदुळ पिकवण्यासाठी हे गाव ओळखले जाते. त्यामुळे लांबूनही लोक मोठ्या संख्येने हे लाल तांदुळ खरेदीसाठी गावात येत असतात. केवळ तांदळाचा भात खावून आम्ही रोगापासून दुर राहतो. असं गावातील लोक म्हणतात.

दरम्यान एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांनी कोरोनाला घाबरूनचं जीव गमावले आहेत. कोरोनावरील लसही आली आहे. तज्ञही कोरोनावर विविध तर्क लावत आहेत. मात्र देशातीलच एका डोंगराळ भागातील गावात कोरोनाचा आजूनही एकही रुग्ण सापडला नसल्याने गावातील लोकांसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबले नसते; तर मयुरसह त्या मुलाचाही गेला असता जीव; वाचा पडद्यामागची कहाणी
गेल्या महिन्याभरापासून घरी बसून आहेत नट्टूकाका, शुटींगला बोलवण्यात येत नाही; कारण…
बायकोच्या प्रेमासमोर नवरा झुकला; बायकोचं तिच्या प्रियकरासोबत स्वत:च लावून दिलं लग्न
कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; तो पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा – शोएब अख्तर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.