कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर चोर, उपचाराच्या नावाखाली लुबाडतात; कॉमेडियनचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | राज्यासह संपुर्ण देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने भयंकर रूप धारण केले आहे. वाढत्या कोरोनामुळे प्रशासन कठोर निर्बंधाची अंमलबजावणी करत आहे. कोरोना रूग्णांचे उपचाराअभावी  हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र तरीही रुग्णांसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतूक होताना दिसून येत आहे.

अशातच प्रसिध्द कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल याने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत त्याने कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर चोर आहेत , उपचाराच्या नावाखाली गरीबांना लुबाडतात असं म्हटलं आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

व्हिडिओमध्ये सुनील पाल म्हणाला की, ९० टक्के डॉक्टरांनी सैतानाचे रूप  धारण केले आहे. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर चोर आहेत. सरकारला माझी विनंती आहे की, या चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी कोरोना रुग्ण वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे.

कोरोनाच्या नावाखाली गरीबांना घाबरवले जात आहे. लस, ऑक्सीजन, बेड, औषधं नाही असं म्हणून गरीब रुग्णांना घाबरवले जात आहे. कोरोना रुग्ण सकाळी अॅडमीट होतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा मृत्यू होतो. रूग्णांच्या नातेवाईकांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार करत आहेत.

सुनील पालच्या या वक्तव्यानंतर डॉक्टर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना ट्टविट करत सुनील पालवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एम्स रुग्णालयातील रेमीडेनशियल डॉक्टरांच्या असोशियनतर्फे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भारतातील कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी डॉक्टर्स बळी देण्यासाठी सज्ज आहेत. आणि अशातच सुनील पालने डॉक्टरांबद्दल केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नाही. एपिडमिक कायद्याच्या अंतर्गत सुनील पालला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार भारतात गेल्या २४ तासांमध्ये १,७१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ८० हजार ५३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या २० लाख ३१ हजार ९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या-
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात प्रेग्नंट हिरोईनने केला “वाथी कमिंग” गाण्यावर भन्नाट डान्स
‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरचं अडकणार लग्नाच्या बेडीत
रेल्वे रुळावर चिमुकला तोल जाऊन पडला; रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत वाचवले प्राण, पाहा व्हिडिओ

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.