जिल्हाधिकारी नाही देवदुत! ना बेडची कमी ना ऑक्सिजनची; नंदूरबारच्या कलेक्टरने करून दाखवलं

नंदुरबार |  कोरोनाच्या परिस्थीतीमुळे राज्यात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र राज्यातील असा एक जिल्हा आहे. जिथं जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात कुठं ऑक्सिजनची कमी दिसत नाही. तर कुठं बेडची कमी दिसत नाही. रुग्णांना उपचारही वेळेवर मिळत आहे.

राज्यातील नंदुरबार या जिल्ह्याची आदिवासी लोकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. डोंगराळ आणि  दुर्गम अशा जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रामाणिक कार्याने आणि योग्य पध्दतीच्या नियोजनाने त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बदलून दाखवली आहे.

एकीकडे ऑक्सिजन अभावी संपुर्ण राज्यात रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. मात्र राजेंद्र भारूड यांनी हतबल न होता  परिस्थितीवर मात केली आहे. भारूड यांनी केलेल्या कामाचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांनी कौतूक केलं आहे.

सुरूवातीला नंदुरबारमध्ये कोरोना रुग्णांसाठी अवघे २० बेड होते. मात्र सध्या जिल्ह्यातील रुग्णालयात बेडची संख्या १ हजार २८९ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णालयात ५ हजार ६२० बेड आहेत. तर कोविड केअर सेंटरसाठी १ हजार ११७ बेड्स आहेत.

तसेच ७ हजारापेक्षा जास्त आयसोलेशन बेड्स आणि १ हजार ३०० आयसीयु बेड्सदेखील उपलब्ध आहेत. हे सर्व झालं आहे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनामुळं. रुग्णांना ऑक्सिजनसाठी भारूड यांनी तीन हवेतून ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवली आहे.

लोकांना लस वेळेवर मिळावी यासाठीही भारूड यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. लसीकरण मोहिमेला वेग देत त्यांनी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पुर्ण केला आहे. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागामार्फत पथकांची स्थापना केली आहे.

भारूड यांनी महाराष्ट्र शासनाकडे कोविड कोचची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वे विभागातर्फे नंदुरबार रेल्वे स्थानकात कोरोना रुग्णांसाठी रेल्वेची सोय करून देण्यात आली आहे. यामध्ये २४ तास आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करत असतात.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे आयुर्वेदीक औषध ठरतंय रामबाण उपाय; आयुष मंत्रालयाचा दावा
“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”
मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.