shocking! अभिनेत्रीने मागवलेल्या ऑनलाईन भातात आढळलं झुरळ

मुंबई। सर्वच लोक रोजच्या धावपळीवाच्या जीवनात अक्षरशः थकून जातात. त्यामुळे अनेकवेळा बरेचजण ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं सोयीचं समजत असतात. पण स्विगीवरून मागवलेल्या पार्सलमध्ये तामिळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दोन मृत जीव आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

साऊथच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकलेली तामिळ अभिनेत्री निवेथा पेठूराजने जेवण ऑर्डर केलं होत. मात्र जेव्हा तिने पार्सल ओपन केलं तेव्हा तिला पार्सलमध्ये दोन मृत झुरळ दिसले. त्यानंतर निवेथाने तात्काळ सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले.

फोटो शेअर तिने कॅप्शमध्ये ‘मला माहिती नाही स्विगी इंडिया आणि निगडीत रेस्टॉरंटचा काय दर्जा आहे. ‘माझ्या जेवणात मला दोनवेळा झुरळ आढळले आहेत. अशा रेस्टॉरंटवर कडक कारवाई व्हायला हवी. शिवाय अशा रेस्टोरेंट्सवर दंड देखील आकारायला हवा. असं निवेथा हिने पोस्टमध्ये लिहिले होते.

त्यानंतर घडलेल्या प्रकारानंतर स्विगीने माफी मागितली आहे. कंपनीने मेलमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या संयमाची काळजी घेऊ. आमची टीम मार्वल यावर कारवाई करेल. काळजी करू नका, ही तक्रार रेस्टॉरंटमध्ये पाठविली गेली आहे.’

निवेथा पेठूराज हि प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री आहे. तिचे आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट ठरले आहेत. व लवकरच ती विराट पर्वम या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ३० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र कोरोनामुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
८ वर्षाच्या तुलसीला मिळाली मदत! १२ आंब्याची किंमत १ लाख २० हजार रुपये, सोबतच १ मोबाईल व २ वर्षांचं इंटनेट फ्री
पंगा गर्लची हुशारी! कंगनाने ‘या’ दिग्दर्शकाला चित्रपटातून काढले बाहेर, म्हणाली…
सनी देओलवर भयंकर चिडले होते चंकी पांडे; न बोलता सेटवरुन गेले होते निघून

लग्नाच्या ९ दिवसानंतर सासरी आलेली मुलगी झाली गायब, नंतर प्रियकरासोबत भेटली ‘या’ अवस्थेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.