मूर्खपणाचा कळस! वाहत्या पाण्यात तरुणाचा बाईक स्टंट, पहा थरारक व्हिडिओ…

अकोला। सध्या गेले अनेक दिवस राज्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्याना तुडुंब पाणी भरले आहे. अशातच गेले दोन ते तीन दिवसांपासून अनेक लोक पावसातून स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मात्र अकोलामधून एक धक्कादायक व जीव टांगणीला लागणार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका तरुणाने वाहत्या पाण्यात गाडी घातल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

ही घटना 10 जूनची असून बार्शी तालुक्यातील सकनी लोहगड मार्गाजवळील आहे. पाऊस जोरदार असल्याने या महामार्गावर तुडुंब पाणी भरले होते. यावेळी एका तरुणीने रस्ता पार करण्यासाठी बाईक पाण्यातून घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाण्याचा झोत मोठा असल्याने तो बाईकसोबत घालती वाहून गेला आहे. पोहता येत असल्याने तरुणा जीव वाचला आहे. पाहुयात व्हिडिओत नक्की काय आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकता की, तरुण कसा पाण्यात वाहून जात आहे. मात्र केवळ या तरुणाच नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. या तरुणाला पोहता येत असल्यानं त्यानं किनारा गाठला. आणि तेथे उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला मदतीचा हात दिला.

तरुणाचा हा व्हिडिओ सर्वांच्या अंगावर काटा उभारणार आहे. जर तरुणाला पोहता आलं नसत तर पावसाच्या पाण्यातून बाईक चालवणं हा स्टंट या तरुणाच्या चांगलाच जीवावर बेतला असता.

महत्वाच्या बातम्या
‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत
तू नेहमी गरोदर का असतेस? ट्रोलरच्या आगळ्यावेगळ्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर, म्हणाली..
कंगना लुटतेय पावसात घोडेस्वारीचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.